सुपरस्टार रजनीकांतही वापरतात सामान्यांच्या घरातील 'ही' गोष्ट

रजनीकांत यांच्या घरातील हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Oct 30, 2022, 06:09 PM IST
सुपरस्टार रजनीकांतही वापरतात सामान्यांच्या घरातील 'ही' गोष्ट title=

मुंबई : अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर 'कंतारा' हा चित्रपट सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटाला प्रत्येक राज्य, समीक्षक आणि काही अभिनेते आणि अभिनेत्रींकडून प्रशंसा मिळाली आहे. या एपिसोडमध्ये असे सुपरस्टार देखील आहेत, ज्यांनी अलीकडेच 'कांतारा'चे खूप कौतुक केले. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या स्तुतीनंतर ऋषभ शेट्टीनं त्यांची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पण या फोटोंमध्ये चाहत्यांना असे काही दिसले की, ज्यावर ते खूपच हसत आहेत.

ऋषभच्या गळ्यात सोन्याची चेन असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. ही चेन रजनीकांत यांनी दिली असेल असा अंदाजही काही चाहत्यांनी लावला आहे. एका नेटकऱ्यानं या फोटोंवर कमेंट करत म्हणाला, 'ऋषभ शेट्टीच्या गळ्यातील सोन्याची चेन कोणाच्या लक्षात आली का? मला वाटतं रजनीकांत सरांनी ही भेट दिली असावी. ही चेन आधी रजणीकांत यांच्या गळ्यात दिसली नंतर सन्मान झाल्यानंतर ती गळ्यातून गायब आहे.'

fans spot mosquito bat in rajnikanth home during his conversation with kantara actor rishab shetty

यासोबतच आणखी एक मजेशीर गोष्ट लोकांच्या लक्षात आली आणि ती म्हणजे, फोटोमध्ये ऋषभ आणि रजनीकांत बोलताना दिसत आहेत. त्यांच्या मागच्या टेबलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये एक मोबाईल फोन, गौतम बुद्धाची मूर्ती आहे. चाहत्यांच्या लक्षात आले की टेबलवर मॉस्किटो बॅट देखील आहे. ही फार मोठी गोष्ट नसली तरी चाहत्यांनी त्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली.

fans spot mosquito bat in rajnikanth home during his conversation with kantara actor rishab shetty

मॉस्किटो बॅट पाहिल्यानंतर चाहत्यांनी मजेदार कमेंट्स केल्या
फोटोंमध्ये मॉस्किटो बॅटपाहून लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिले की, 'रजनी सरांनाही मॉस्किटो बॅटची गरज आहे हे जाणून दिलासा मिळाला. मला वाटले, कदाचित डास त्यांच्या घरात घुसण्याची हिंमत करणार नाहीत.' दुसर्‍या यूजरने कमेंट केली की, 'रजनीकांत सर मॉस्किटो बॅट वापरतात. मला वाटले ते फक्त मध्यमवर्गीय कुटुंबातच वापरले जाते' .