Urfi Javed अडकणार लग्नबंधनात? , प्री-वेडिंग व्हिडिओ व्हायरल

 उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीपासून सतत चर्चेत असते.

Updated: Feb 17, 2022, 06:53 PM IST
 Urfi Javed अडकणार लग्नबंधनात? , प्री-वेडिंग व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई :  उर्फी जावेद बिग बॉस ओटीटीपासून सतत चर्चेत असते. अभिनेत्रीला तिच्या कपड्यांमुळे नेहमीच ट्रोलही केलं जातं . उर्फी तिच्या स्टाइलमुळे  स्टाईल सेन्सेशन बनली आहे. पण यावेळी उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. उर्फीने तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटोशूट केलं आहे. ज्याला तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, प्री वेडिंग फोटोशूट. हे कॅप्शन वाचून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. 

जर हे फोटो पाहून तुम्ही  जास्त विचार केला असेल तर, आम्ही तुम्हाला या फोटोंच्या मागचं सत्य सांगणार आहोत. वास्तविक, सध्या उर्फी 'बेवफा' फेम गायक कुंवरसोबत एका म्युझिक अल्बमचं शूटिंग करत आहे. उर्फीने स्वतः फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्फीने कुंवरसोबतचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला थंडी वाजत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत उर्फीने कॅप्शनमध्ये लिहीलं की, ''सध्या मी तुमसे ना जाने क्यों हे एकच गाणं गाऊ शकते. जे रणबीर कपूरवर चित्रित केलेलं आहे. मात्र हा व्हिडिओ खरा नसून उर्फीच्या शूटींग दरम्यानचा आहे आणि उर्फी जावेद सध्या लग्न करणार नाही ही चाहत्यांसाठी एक दिलासादायकच बातमी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.