'लखनऊ सेंट्रल' चित्रपट येरवड्याच्या कैद्यांना दाखवायचा आहे : फरहान अख्तर

फरहान अख्तरने ‘लखनऊ सेंट्रल’या त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच पुण्याच्या येरवडा जेलमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित केले.  

Updated: Aug 16, 2017, 08:55 PM IST
'लखनऊ सेंट्रल' चित्रपट येरवड्याच्या कैद्यांना दाखवायचा आहे : फरहान अख्तर   title=

मुंबई : फरहान अख्तरने ‘लखनऊ सेंट्रल’या त्याच्या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे नुकतेच पुण्याच्या येरवडा जेलमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित केले.  

त्यावेळेस जर अधिकार्‍यांनी परवानगी दिली तर आपण कैद्यांना चित्रपटही दाखवू इच्छितो असे फरहान म्हणाला.  

' लखनऊ सेंट्रल जेल' मधील कैद्यांनी बॅन्ड कसा सुरू केला या विषयावर आधारित एका सत्यकथेचे स्वरूप या चित्रपटात आहे. रंजीत तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

'लखनऊ सेंट्रल' या चित्रपटात फरहान एका कैद्याची भूमिका साकारात आहे. नुकतेच त्याने ' तीन कबूतर' हे गाणं रसिकांच्या भेटीला आणले आहे. तर हा चित्रपट 15 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

गाण्याच्या प्रदर्शन सोहळ्यादरम्यान येरवडा जेलचे अतिरिक्त पोलिस महानिर्देशक भूषण कुमार उपाध्याय उपस्थित होते.  त्यावेळी हा चित्रपट  कैद्यांना दाखवण्याची सोय करण्याबाबत प्रयत्न करू असे ते म्हणाले.  या कार्यक्रमात 3 हजार कैदी आणि पोलिस कर्मचारी देखील सहभागी झाले होते.