कोडोंजी 'फर्जंद' यांच्यावर आधारित सिनेमाचा ट्रेलर रिलीज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या महती आपण कायम वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवली आहे.

Dakshata Thasale Updated: Mar 21, 2018, 10:09 AM IST
कोडोंजी 'फर्जंद' यांच्यावर आधारित सिनेमाचा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या महती आपण कायम वेगवेगळ्या स्वरूपात अनुभवली आहे.

रयतेचा राजा असलेल्या महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी अनेकांच मोलाचं योगदान लाभलं आहे. त्यातलेच एक कोंडाजी फर्जंद ज्यांनी पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली आहे. हा सगळा रोमांचक थरार आता 'फर्जांद' या सिनेमातून पडद्यावर येणार आहे. 

‘फर्जंद’ युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या पहिल्या टीझरमधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर तसेच रांगड्या युवकाची झलक प्रेक्षकांना पहिल्या टीझर मधून पाहायला मिळाली असून अल्पावधीतच या टीझरने कमाल केली आहे.

या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.