'आता मृत्यू जवळ आला आहे...' बॉलिवूडच्या खलनायकानं व्यक्त केली भीती

एका अदृष्य व्हायरसने जगात  हाहाकार माजवला आहे. 

Updated: May 4, 2021, 01:34 PM IST
'आता मृत्यू जवळ आला आहे...' बॉलिवूडच्या खलनायकानं व्यक्त केली भीती

मुंबई :  देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत तर वाढ होतचं आहे, पण दुसरीकडे प्रत्येक दिवशी कोरोनामुळे हजारो रूग्णांचा जीव जात आहे. एका अदृष्य व्हायरसने जगात  हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खलनायक क्राईम मास्टर गोगो म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील भीती व्यक्त केली आहे. 'आता मृत्यू जवळ आला आहे...' असं म्हणत त्यांनी स्तःची आणि कुटुंबाची काळजी घण्याचं आवाहन केलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार झलेल्या एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणाले, 'वर्ष फार कठीण आहे. आता मृत्यू देखील जवळ आला आहे. पूर्वी लोकं म्हणायची मी आता मरणार पण पुढचे 10 वर्ष जगायची. पण आता मृत्यू काय आहे? आज लोकं माश्यांसारखे मरत आहेत.' असं म्हणत त्यांनी परिस्थिती फार भयावह असल्याची जाणीव करून दिली आहे. 

याठिकाणी शक्ती कपूर यांनी त्यांच्या मित्राचं एक उदाहरण दिलं, 'माझ्या मित्राच्या भावाला सकाळी रूग्णालयात दाखल केलं आणि सायंकाळी त्याच्या निधनाची हातमी कानावर आली. तुम्ही अंदाजा नाही लावू शकतं. परिस्थीती हाता बाहेर जात आहे. लसीकरण लवकरात लवकर करून घ्या.' असं देखील शक्ती कपूर यांनी यावेळेस सांगितलं. 

दरम्यान, शक्ती कपूर यांचा मुलगा  सिद्धांत कपूरने (Siddhant Kapoor)प्लाझ्मा दान केलं. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि खुद्द शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली. शिवाय अन्य लोकांना देखील प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळे कोरोना महामारीवर आपण विजय मिळवू शकू.