Britney Spears : गायिका आणि पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सने तिच्या आयुष्यावर आणि कारकिर्दीवर एक पुस्तक लिहिलं आहे: द वुमन इन मी. हे पुस्तक अमेरिकेत धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात हे पुस्तक विक्रीसाठी आलं आणि ते पुस्तक येताच वाचकांना या पुस्तकांनाआकर्षित केलं. ब्रिटनीने तिच्या अल्पवयीन वयात प्रसिद्धी मिळवली आणि तिचे वैयक्तिक जीवन विवादांनी भरलेलं आहे.
तिच्या जीवनातील सत्य जाणून घेण्यासाठी लोकं केवळ पुस्तकांच्या दुकानातच गर्दी करत नव्हते, तर पुस्तकाची ऑनलाइन विक्रीही प्रचंड होत आहे. ब्रिटनीची कथा ही अमेरिकन कुटुंबं आणि समाजातील रूढीवादी कल्पनांशी संघर्षाची कथा आहे. तिला तिच्या वडिलांपासून स्वातंत्र्यासाठी दीर्घ लढा द्यावा लागला, जेणेकरून ती स्वतःचं आर्थिक निर्णय घेऊ शकतील.
ब्रिटनीच्या आयुष्यात वेळोवेळी अनेक पुरुष आले आणि गेले. ब्रिटनी लग्नाशिवाय आई बनली. विशेषतः प्रसिद्ध अमेरिकन गायक-अभिनेता जस्टिन टिम्बरलेकसोबतचं तिचं नातं सतत चर्चेत राहिलं. ब्रिटनीने या सर्व गोष्टी आठवणींच्या स्वरूपात नोंदवल्या आहेत. अमेरिकेत हे पुस्तक प्रिंट, ई-बुक्स आणि ऑडिओबुक्समध्ये प्रसिद्ध झालं. पहिल्या आठवड्यात त्याच्या 11 लाख प्रती विकल्या गेल्या.
24 ऑक्टोबर रोजी या पुस्तकाचं प्रकाशन झालं. हे पुस्तक गॅलरी बुक्सने प्रकाशित केलं आहे. ब्रिटनी स्पीयर्सने पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, मी माझ्या मनापासून या आठवणी लिहिल्या आहे. जगभरातील लोकांनी ज्या प्रकारे ते स्वीकारले त्याबद्दल मी चाहते आणि वाचकांचा आभारी आहे.
'द वुमन इन मी' सध्या अॅमेझॉनवरील पुस्तकांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. गेल्या आठवड्यातही हे सर्वाधिक वाचलं गेलेलं आणि विकले गेलेले नॉन-फिक्शन पुस्तक होतं. मात्र, 28 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूनंतर, त्याचं फ्रेंड्स, लव्हर्स आणि बिग टेरिबल थिंग हे पुस्तक ट्रेंडिंगला आलं होतं. 'द वुमन इन मी'मध्ये ब्रिटनीचा तिच्या वडिलांसोबतचा संघर्ष आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत. तिने सांगितले की जस्टिन टिम्बरलेकला डेट करत असताना ती गरोदर राहिली आणि नंतर तिचा गर्भपात झाला. ब्रिटनीने असंही सांगितलं की प्रेमात तिचा कसा विश्वासघात झाला आणि एका टेक्स मॅसेजमुळे तिचा ब्रेकअप झाला. पुस्तकाच्या यशानंतर, ब्रिटनी स्पीयर्सने घोषणा केली की ती पुढील वर्षी द वुमन इन मी: व्हॉल्यूम 2 रिलीज करेल.