Pune Crime News: कल्याणमध्ये 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या झाल्याचे घटना ताजी असतानाच आता पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. आठ आणि नऊ वर्षीय अशा दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोघीही बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते.
राजगुरुनगर शहरातून दोघी बहिणी काल बेपत्ता झाल्या होत्या. काल दुपारी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहलालगत एका इमारतीच्या बाजुला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते. दोघी बहिणींचे मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांना एकच धक्का बसला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर शहरातील वाडा रोड परिसरातील या कुटुंबाच्या घराच्यावर एक आचारी राहायला आला होता. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचे तपासात उघड झालं आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले अन तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला अन आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.
आपलं बिंग फुटेल या भीतीने त्यानें एका बहिणीची हत्या केली. त्यानंतर दुसरी बहिणीमुळं घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीने त्याने तिचाही तशाच प्रकारे जीव घेतला. यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले. राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. तर बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात आहेत, या अहवालातून नेमकं काय-काय घडलं हे स्पष्ट होईल
कल्याण कोळशेवाडी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीचा अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे. मुख्य आरोपी विशाल गवळी याला शेगाव वरून कल्याण क्राईम ब्रांचने ताब्यात घेऊन ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. आरोपीची पत्नी साक्षी गवळी हिलादेखील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला मदत करण्याच्या आरोपांवरुन तिला अटक करण्यात आली आहे.