फेमिना मॅगझीनसाठी ऐश्वर्याचे खास फोटोशूट...

ऐश्वर्या राय बच्चनचे सौंदर्य आणि अदा प्रत्येकालाचा घायाळ करतात.

Updated: Mar 16, 2018, 10:08 AM IST
फेमिना मॅगझीनसाठी ऐश्वर्याचे खास फोटोशूट... title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चनचे सौंदर्य आणि अदा प्रत्येकालाचा घायाळ करतात. वयाच्या ४४ शी तही ती तितकीच तरुण आणि सुंदर दिसते. तिचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.

मॅगझिन फोटोशूट

अलिकडेच ऐश्वर्याने फेमिना मॅगझिनच्या कव्हरसाठी फोटोशूट केले. त्यातील तिचा ग्लॅमरस लूक प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या फॅशन मॅगझिन फेमिनामध्ये २०१८ मधील सुंदर महिलांची यादी जाहिर केली आहे. 

ऐश्वर्याचा खास अंदाज

फेमिनाच्या कव्हरपेजवरील फोटोत ऐश्वर्याने मेटालिक सिल्व्हर रंगाचा कोट घातला आहे. चायनिय कॉलरच्या या कोटाची बटणेही स्टायलिश आहेत. ऐश्वर्याचा हा लूक नक्कीच लक्षवेधी आहे. कर्ली हेअर्स आणि लाईट मेकअपने हा लूक अचून साध्य झाला आहे. 

लवकरच या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस

काही दिवसांपूर्वीच फन्ने खान या सिनेमातील ऐश्वर्याचा लूक समोर आला होता. यात ऐश्वर्या आणि अनिल कपूर जवळपास १५ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. यात राजकुमार रावही आहे.