गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' कलाकाराचं करिअर

Vishal Malhotra नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे, तर गर्व का करू नये आणि त्यामुळे किती नुकसान होते हे सांगितले आहे. 

Updated: Dec 19, 2022, 06:53 PM IST
गर्वाचं घर खाली; स्वभावामुळे संपलं Shahid Kapoor सोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या 'या' कलाकाराचं करिअर title=

Vishal Malhotra Talked About His Career's End : अभिनेता विशाल मल्होत्राचं (Vishal Malhotra) नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि जर तुम्हाला हे नाव आठवत नसेल तर फोटो पाहून तुम्ही लगेच त्याला ओळखाल. विशाल हा एकेकाळी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसायचा. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून तो मोठ्या पडद्यावर दिसला नाही. विशाल हा 'शरारत', 'हिप हिप हुर्रे' आणि 'क्या मस्त है लाइफ' सारख्या अनेक मालिकांमध्ये  दिसला होता. त्याचसोबत विशालनं मोठ्या पडद्यावर 'इश्क विश्क', 'जन्नत', 'एक विवाह ऐसा भी' आणि 'हॅपी न्यू इयर' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसला. एकेकाळी अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या विशालला आता काम मिळत नाही. 

विशालनं अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं आणि जेव्हा तो जशाच्या शिखरावर गेला तेव्हा तो स्वत: ला मोठा स्टार समजू लागला. याविषयी बोलताना विशालनं जोश टॉक या हिंदी शोमध्ये बोलला. इतकंच नाही तर त्यानं हे सत्य असल्याचे म्हणत कबूल केले आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपल्या करियरमधल्या चढ-उतारांबद्दल विशालनं यावेळी सांगितले. 'मी जे काही करतोय ते तर माझ्याकडे आहेच. असे मला वाटायचे. याशिवाय मला काहीतरी वेगळं करायचं आहे, असं मला वाटू लागलं. त्यानंतर मी गर्विष्ठ आणि आळशी झालो. हा विचार करू लागल्यामुळे विशालनं त्याच्याकडे असलेल्या सगळ्या भूमिका गमावल्या. आता तर विशालवर अशी वेळ आली आहे की आयुष्य घालवण्यासाठी तो जे काही मिळेल ते काम करण्यासाठी तयार होता. त्यानंतर त्यानं अॅडव्हरटाझमेंट एजन्सी सुरू केली. या विषयी सांगताना विशाल म्हणाला, 'लोक अभिनेता होण्यासाठी नोकरी सोडतात, जेव्हा मला अभिनय मिळत नव्हता तेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली. 

हेही वाचा : 'मला माझ्या मित्रांमुळे...', Neena Gupta यांचा बॉलिवूडमध्ये काम मिळवण्याविषयी मोठा खुलासा

विशालला अभियन क्षेत्रात पुन्हा येण्यासाठी जवळपास 12 वर्षे प्रतिक्षा करावी लागली. विशाल हळूहळू लोकांना भेटू लागला या दरम्यान देखील त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. विशाल म्हणाला, 'एकदा मी एका भूमिकेच्या संदर्भात दिग्दर्शकाकडे पोहोचलो. त्या दिग्दर्शकानं मला सांगितलं की मी तुझ्या चित्रपटातील तिसरा असिस्टंट दिग्दर्शक होतो. आज तू कुठे आहेस आणि मी कुठे आहे. त्यावेळी मला खूप अपमान झाल्याचे वाटले. पण अपमानाचा एक घोट पिऊन मी तिथून निघालो. काहीतरी करण्याची विशालची इच्छा होती. त्यानंतर विशाल सतत ऑडिशन देऊ लागला. शेवटी त्याला 'तू है मेरा संडे' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, ज्याला चाहत्यांकडून भरभरून दाद मिळाली. आता विशालला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्याची संधी मिळाली आहे. यानंतर विशालला ओटीटी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. आता विशाल दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता आहे. त्याचबरोबर त्याच्या जाहिरात एजन्सीची वार्षिक ट ओव्हर हा 4 ते 5 कोटी आहे. (film star vishal malhotra ego destroy his career shah rukh khan ranbir kapoor ritesh deshmukh riteish deshmukh shahid kapoor)