'ठाकरे' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त 'ठाकरे'चा फर्स्ट लूक

Updated: Jun 19, 2018, 04:17 PM IST
'ठाकरे' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज title=

मुंबई : शिवसेनेच्या ५२व्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं संजय राऊत निर्मित ठाकरे या सिनेमाचा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आलाय. या सिनेमात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारतोय. बाळासाहेबांच्या लूकमधला नवाज या सीनमध्ये पहायला मिळतोय. अभिजीत पानसे यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत या सिनेमाची निर्मीती होणार आहे. 2019च्या जानेवारीत ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित होतोय.