मुंबई : बॉलिवूडचा दाबंगस्टार सलमान खानच्या 'रेस3'ला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांमध्ये 100 कोटींचा पल्ला पार केला आहे. आता रेस 3 नंतर सलमान खान 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
'भारत' या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री प्रियंका चोप्रा एकत्र दिसणार आहे. सध्या हॉलिवूडमध्ये रमलेली प्रियंका पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. 2016 साली प्रदर्शित झालेल्या 'जय गंगाजल' या चित्रपटामध्ये प्रियंका शेवटची दिसली होती. त्यानंतर पुन्हा 'भारत'मधून ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
सध्या ग्लोबल स्टार बनलेली प्रियंका चोप्रा अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोच्या तिसर्या सिझनमध्ये व्यस्त आहे. हॉलिवूडमध्ये रमलेल्या प्रियंकाने 14 कोटींची मागणी केली होती मात्र अखेर हे डील 12 कोटीचे झाल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. 'पद्मावत'साठी दीपिका पादुकोणने 12 कोटी मानधन घेतले आहे. 14 कोटी हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक मागण्यात आलेला मानधनाचा आकडा आहे.