वरूणच्या 'मिस्टर लेले' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केला.

Updated: Jan 13, 2020, 03:14 PM IST
वरूणच्या 'मिस्टर लेले' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री वरूण धवन त्याच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर ३डी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील झळकणार आहे. तर दुसरीकडे वरूणच्या आणखी एका चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मिस्टर लेले' असे त्याच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटात वरूण मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण जोहर यांचे आहे. तर करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित केला. या पोस्टरमध्ये वरूण अंडरवेअरवरमध्ये दिसत आहे. तर त्याच्या हातात रिव्हॉल्वर आणि कमरेला फॅनी पॅक बांधलेला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Just when you thought that the news couldn’t get any better, it got more entertaining! #MrLele aka @varundvn along with @shashankkhaitan are going to start 2021 with a bang! Releasing 1st Jan, 2021. @apoorva1972 @dharmamovies

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

१ जानेवारी २०२१ रोजी 'मिस्टर लेले' रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपटाचे लेखन शशांक खेतानने केले आहे. चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी झळकणार होती. पण आता ती या चित्रपटाचा भाग नसल्याचे समजत आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटामध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर नाही तर जान्हवी कपूरची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

परंतु चित्रपटचाबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर यंदाच्या वर्षी वरूणचे दोन चित्रपटं प्रदर्शित होणार आहे. 'स्ट्रीट डान्सर ३डी' आणि ‘कुली नंबर १’ हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वरुण व सारा अली खान मुख्य भूमिका साकारत आहेत.