मुंबई : खूप दिवसांपासून प्रेग्नेसीमध्ये देखील फॅशन आयकॉन ठरलेल्या नेहा धुपियाचे चाहते तिच्या मुलीच्या फोटोची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. असं असताना मेहरच्या आजोबांनी म्हणजे अंगदच्या वडिलांनी या मुलीचा फोटो शेअर केला आहे.
नेहा धुपियाने 18 नोव्हेंबर एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 20 नोव्हेंबरला नेहाने या मुलीच्या पायाचा फोटो शेअर केला होता आणि तिचं नाव देखील शेअर केलं होतं. आता या बाळाचा संपूर्ण फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अंगद आणि नेहाने मेहर धुपिया बेदी असं या बाळाचं नाव ठेवलं आहे. आता मेहरच्या आजोबांनी हा फोटो शेअर केला असून त्यांनी तिला सुंदर आशिर्वाद असा मॅसेज केला. आजोबांनी एक इमोशनल मॅसेज केला आहे.
नेहा आणि अंगद यांनी आपल्या मुलीचं नाव 'मेहर' असं ठेवलं आहे. मेहर धुपिया बेदी या नावाने ही मुलगी ओळखली जाणार आहे. नेहा आणि अंगदने मुलीसाठी पर्सियन नाव ठरवलं आहे. ज्याचा अर्थ आहे 'कृपा'. नेहाने मेहरच्या पायाचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने टोज घातले आहेत. Hallo World असं यावर लिहिलं आहे. हा फोटो शेअर करताच मेहरला अनेक आशिर्वाद मिळायला सुरूवात केली आहे.