एकमेकांच्या प्रेमात मग्न सारा - कार्तिक

बहुप्रतिक्षित 'लव आज कल' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित  

Updated: Jan 16, 2020, 01:08 PM IST
एकमेकांच्या प्रेमात मग्न सारा - कार्तिक  title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन त्यांच्या नात्यामुळे कायम चर्चेत असतात. त्याचप्रमाणे अनेक दिवसांपासून त्यांच्या बहुचर्चित 'लव आज कल' चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. कधी सेटमधील फोटो व्हिडिओ तर कधी त्यांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगलेली असेत. या चित्रपटाच्या माध्यमातून सारा - कार्तिकला एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

चाहत्यांची ही उत्सुकता काही दिवसांनी संपणार आहे. कारण आता लवकरच या दोघांना रूपेरी पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे. नुकताच चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये दोघे एकमेंकांच्या प्रेमात मग्न झालेले दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Meet Veer and Zoe Come get wound up in our whirlwind wonderland LoveAajKal  Trailer out tomorrow@kartikaaryan @imtiazaliofficial #DineshVijan @wearewsf @maddockfilms @officialjiostudios @officialjiocinema @reliance.entertainment @sarkarshibasish @randeephooda @ipritamofficial @_arushisharma

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

चित्रपटाचा हा पोस्टर चात्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. पोस्टरमध्ये कार्तिक प्रती साराचं असलेलं प्रेम स्पष्टपणे झळकत आहे. खुद्द सारा आणि कार्तिकने चित्रपटाचा पोस्टर त्यांच्या सोशल अकाउंटवर प्रदर्शित केला. सध्या हा पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

दिग्दर्शक करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये अभिनेत्री सारा खानने तिच्या मनात असलेली गोष्ट सर्वांशी शेअर केली होती. तिला कार्तिक बरोबर डेटवर जायचं आहे, अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. त्यानंतर इम्तियाज अलीच्या 'लव आजकल'' या आगामी चित्रपटाच्या दुसऱ्या भागात कार्तिक आणि साराला एकत्र काम करण्याची संधी मिळली. शुक्रवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

२००९ मध्ये सैफ आणि दीपिका यांचा 'लव आजकल' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपट हीट झाला होता. आता सारा आणि कार्तिकची जोडी पद्यावर काय धमाल करणार ? हे चित्रपट आल्यावर कळेलच. चित्रपटामध्ये त्या दोघांची केमिस्ट्री कशी आहे, हे प्रेक्षकांना लवकरचं पाहायला मिळणार आहे.