सर्वाधिक कमाईच्या बाबतीत या अभिनेत्याने सलमानला टाकलं मागे

पाहा कोण आहे सर्वाधिक कमाई करणार बॉलिवूड अभिनेता

Updated: Aug 23, 2018, 12:03 PM IST
सर्वाधिक कमाईच्या बाबतीत या अभिनेत्याने सलमानला टाकलं मागे title=

मुंबई : जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. या यादीमध्ये अभिनेता आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सलमान खानला मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या वर्ल्ड हाईएस्ट पेड अॅक्टर्सच्या यादीत अक्षय 283.5 कोटी रुपये वार्षिक कमाईसह 7 व्या स्थानावर आहे. सलमान खान 269.5 कोटीसह 9व्या स्थानावर आहे. मागच्या वर्षी अक्षय कुमार सलमान खानपेक्षा मागे होता.

सलमानला टाकलं मागे

अक्षय कुमारने मागच्या वर्षी 227 कोटी कमवले होते. तो मागच्या वर्षी 10व्या स्थानी होता. अक्षयने यावर्षी 3 स्थानांनी झेप घेतली आहे. सलमान खानची मागच्या वर्षाची कमाई 237 कोटी होती. मागच्या वर्षी देखील सलमान 9व्या स्थानावर होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार 2017 च्या फोर्ब्सच्या यादीत शाहरुख खान 243 कोटींसह 8 व्या स्थानावर होता. पण यावर्षी तो टॉप 10 मध्ये जागा नाही मिळवू शकला.

शाहरुखला जागा नाही

मागच्या वर्षी फोर्ब्सने सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-100 एंटरटेनर्सची यादी जाहीर केली होती. यामध्ये देखील अक्षय कुमार आणि सलमान खानने जागा मिळवली होती. अक्षय या यादीत 76व्या स्थानी तर सलमान 82व्या स्थानी होता. दोघांनी एकूण 535 कोटींची कमाई केली होती. या यादीत अमेरिकेचा बॉक्सर फ्लॉयड मेवेदर पहिल्या स्थानी होता. एका वर्षात त्याची कमाई 1,952 कोटी होती. 10व्या स्थानी पोर्तुगालचा फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो होता. त्याची कमाई 740 कोटी होती.