मैत्रिणींनी प्रियांकाला लग्नाआधीच दिलं 'हे' सरप्राईज

ही 'देसी गर्ल' अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: Oct 29, 2018, 12:10 PM IST
मैत्रिणींनी प्रियांकाला लग्नाआधीच दिलं 'हे' सरप्राईज  title=

मुंबई : 'देसी गर्ल' म्हणून हिंदी कलाविश्वात नावारुपास आल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा मोर्चा परदेशातील कलाविश्वाकडे मिळवला. पाहता पहता हॉलिवूडमध्येही ती चांगलीच स्थिरावली. अशी ही 'देसी गर्ल' सध्या व्यग्र आहे ते म्हणजे तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये. 

अवघ्या काही दिवसांमध्ये ही 'देसी गर्ल' अमेरिकन गायक निक जोनास याच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. याच धर्तीवर प्रियांकाच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी कास ब्रायडल शॉवरचं आयोजन केलं होतं. 

मैत्रिणींनी आयोजित केलेल्या या पार्टीत ती सुरेख अशा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. 

priyanka chopra bridal shower

एका मासिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार प्रियांकासाठीची ही पार्टी न्यूयॉर्कमधील 'टिफीनीज ब्ल्यू बॉक्स कॅफे' येथे आयोजित करण्यात आली होती.

पार्टीचं आयोजन करण्यासाठी चित्रपट निर्माती मुबिना रॅत्तोन्से आणि प्रियांकाची मॅनेजर अंजुला अचारिया या दोघींनी पुढाकार घेतला होता. 

पीसीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी यावेळी केली रिपा, ल्युपिता न्योंगो, केविन जोनास आणि इतरही मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली. 

सोशल मीडियावर तिच्या या ब्रायडल शॉवरचे बरेच फोटो पाहायला मिळाले. या सर्व फोटोंमध्ये प्रियांकाच्या चेहऱ्यावर आनंदलहरी पाहायला मिळत होत्या.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x