सुशांतसिंह गावच्या गल्लीत आजही जिवंत, मित्र म्हणतात, Down to Earth, ईगो कधीच दाखवला नाही

 चित्रपटांमध्ये त्यांने भन्नाट भूमिका साकारत फक्त बॉक्स ऑफिसवरचं नाही चाहत्यांच्या मनात देखील राज्य केलं. 

Updated: Jun 14, 2021, 08:27 PM IST
सुशांतसिंह गावच्या गल्लीत आजही जिवंत, मित्र म्हणतात, Down to Earth, ईगो कधीच दाखवला नाही title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षभरापासून त्याचे अनेक जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेला मानव अर्थातचं सुशांत आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. मालिकेतून काढता पाय घेतल्यानंतर त्याने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांने भन्नाट भूमिका साकारत फक्त बॉक्स ऑफिसवरचं नाही चाहत्यांच्या मनात देखील राज्य केलं. 

या घटनेला एक वर्ष उलटून गेले तरी मल्लडीहा गावातील लोक सुशांतला विसरू शकले नाहीत. गावकरी म्हणतात की, 'आपण ज्या व्यक्तीला विसरतो त्याचं व्यक्तीची आपल्याला आठवण येते. आम्ही सुशांतला विसरलो नाही. तो आजही आमच्या सर्वांच्या ह्रदयात आहे.' आज सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे त्याच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या जात आहेत.

सुशांतच्या गावच्या मित्रांनी देखील आज दुःख व्यक्त केलं. 'सुशांत  Down to Earth होता, त्याने ईगो कधीच दाखवला नाही' महत्त्वाचं म्हणजे एक वर्ष उलटून गेले तरीही गावातील लोकांना आणि मित्रांना सुशांतला न्याय न मिळाल्याची खंत आहे.

सुशांत एक प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो त्याच्या गावातल्या मित्रांना भेटायला नेहमी गावी जायचा. एवढंच नाही तर तो ज्या शाळेत शिकला होता, लहानपणी ज्या शाळेच्या मैदानावर अनेक चौके मारले, सेलिब्रिटी झाल्यानंतर देखील तो त्याच्या शाळेत खेळायला जायचा. आज देखील सुशांत त्या शाळेच्या मैदानात आणि शिक्षकांच्या मनात जिवंत आहे. 

सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 रोजी राहत्या घरी गळफास घेत स्वतःचा जीवन प्रवास संपवाला. पण त्याच्या मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली अशा चर्चा जोरदार पसरल्या. आता त्याच्या  आत्महत्येचं रहस्य उलगडणारा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटचं नाव 'न्याय : द जस्टिस' (Nyay : The Justice) असं आहे.