खान कुटुंबातील मुलांचं नशीब सलमानच्या हातात, कोण आहे पदार्पणासाठी तयार?

 खान कुटुंबाची नवी पिढी बॉलिवूडमध्ये येण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Sep 17, 2021, 02:21 PM IST
खान कुटुंबातील मुलांचं नशीब सलमानच्या हातात, कोण आहे पदार्पणासाठी तयार?

मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. सलमानमुळे बॉलिवूडला नवे चेहरे भेटले. एवढंच नाही तर सलमानमुळे अनेकांचं नशीब देखील बदललं आहे. पण आता सलमान त्यांच्या कुटुंबातील मुलांचं नशीब बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या खान कुटुंबातील अनेक सदस्य इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. तर आता खान कुटुंबाची नवी पिढी बॉलिवूडमध्ये येण्याच्या मार्गावर आहे. आपण बोलत आहोत सलमानच्या भावंडांच्या मुलांबद्दल. आता अरबाज, सोहेल, अलविरा आणि अर्पिता खान यांच्या मुलांकडे सर्वांचं लक्ष आहे. 

सलमान खान के परिवार पर रहती है फैंस की निगाह

अयान अग्निहोत्री आणि अलिजेह अग्निहोत्री
अयान अग्निहोत्री हा अलवीरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. घरात सर्वात मोठा असल्यामुळे अयानला सर्वप्रथम संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर अयानची लहान बहिण अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. अलिजेहने एका जाहिरातीच्या माध्यमातून सर्वांचं मन जिंकलं आहे. 

अलिजेह अग्निहोत्री (Alizeh Agnihotri)

अरहान खान 
अरहान खान हा अरबाज खान आणि मलायका अरोराचा मुलगा आहे. अभिनेता नसला तरी सोशल मीडियावर त्याची चर्चा असते. अरबाज आणि मलायका विभक्त झाले असले तरी मलायका तिच्या मुलाची विशेष काळजी घेते. आता येत्या काळात अरहान बॉलिवूड सलमानप्रमाणे राज्य करणार असल्याची शक्यता आहे. 

निर्वाण खान आणि योहान खान 
सोहेल खानच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण खान आहे. तर छोट्या मुलाचं नाव योहान खान. नुकताचं निर्वाणला सलमानसोबत फिरताना पाहिलं तर योहान अद्याप 10 वर्षांचा आहे. 

अहिल शर्मा आणि आयत शर्मा
अहिल शर्मा आणि आयत शर्मा दोघे अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांची मुलं आहेत. सलमान दोघांसोबत कायम खेळताना व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असतो.