Gadar 2 चा First Day First Show सुरु असतानाच सनी देओल, अमिषासाठी धक्कादायक बातमी

Gadar 2 Movie Release: सन 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटाच्या सिक्वेलसंदर्भात प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता असून हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असतानाच या चित्रपटासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा या चित्रपटाच्या कमाईवरही परिणाम होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 11, 2023, 10:58 AM IST
Gadar 2 चा First Day First Show सुरु असतानाच सनी देओल, अमिषासाठी धक्कादायक बातमी title=
मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाचं प्रमोशन सुरु होतं. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला

Gadar 2 Piracy Leaked Online In HD: अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांची प्रमुख भूमिका असलेला 'गदर-2' आज प्रदर्शित झाला. 2001 साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' चित्रपटाचा दुसरा भाग असलेला हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड-2' चित्रपटसमोर असतानाही थिएटरमध्येही 'गदर-2' पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 'गदर-2' समोर रजनीकांत आणि मोहनलाल यांच्या 'जेलर' चित्रपटाचंही आव्हान असणार आहे.

फर्स्ट डे फर्स्ट शो सुरु असतानाच ऑनलाइन लीक

'गदर-2'ला चांगलं यश मिळेल असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी बांधला आहे. एका आठवड्यात हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये जाईल असंही सांगितलं जात आहे. मात्र या चित्रपटाला एका गोष्टीचा फटका बसू शकतो ही भिती खरी ठरली आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच हा चित्रपट पायरसीला बळी पडला आहे. हा चित्रपट ऑनलाइन लिक झाला असून चित्रपटाचं एचडी व्हर्जन पायरेसी करणाऱ्यांनी डाऊनलोडसाठी उपलब्ध करुन दिलं आहे. अनेक पायरेसी वेबसाईटवर 'गदर-2' उपलब्ध आहेत. यामध्ये तामिळ रॉकेट्स, टेलीग्राम, फिल्मीझीया, मुव्हीरुल्स सारख्या कृप्रसिद्ध साईट्सचा समावेश असून इथं वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये 'गदर-2' उपलब्ध आहे. एकीकडे 'गदर-2'चा फर्स्ट डे फर्स्ट शो सुरु असतानाच हा चित्रपट पायरसीला बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट ऑनलाइन लिक झाल्याने चित्रपटाच्या कमाईवरही नकारात्मक परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

अनेक चित्रपटांना बसलाय फटका

अशाप्रकारे कोणताही मोठा चित्रपट लिक होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच लिक झाले आहेत. रजनीकांत यांच्या 'जेलर' चित्रपटालाही पायरसीची फटका बसला आहे. हा चित्रपटही प्रदर्शनाच्या दिवशीच लीक झाला. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाबरोबरही असाच प्रकार घडला होता. 

पायरेटेड चित्रपट पाहणे कायद्याने गुन्हा तसेच धोकादायकही कारण...

कोणीही पायरेटेड साईट्सवरुन असे चित्रपट डाऊनलोड करुन पाहू नये असं तज्ज्ञ सांगतात. अशाप्रकारे चित्रपट डाऊनलोड करुन पाहणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कॉपीराईट कायदा 1957 अंतर्गत पायरसीला पाठिंबा देणंही गुन्हा आहे. त्यामुळे चित्रपट हे चित्रपटगृहांमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतील तेव्हाच पहावेत, असं आव्हान चित्रपट निर्मात्यांकडून केलं जातं. अनेकदा पायरसीच्या माध्यमातून होणारी कमाई चुकीच्या कामांसाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना चालना देण्यासाठी वापरल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. त्यामुळेच पायरसीच्या माध्यमातून अशा कृतींना खतपाणी घालू नये असं आव्हान सायबरतज्ज्ञ करतात. पायरेटेड साईट्सवरुन मोबाईलवर व्हायरस डाऊनलोड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही असंही हे सायबरतज्ज्ञ सांगतात.