मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम घराघरात पाहिला जाणारा आणि सर्वांचा आवडीचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम बर्याच वर्षांपासून टीव्हीच्या जगाच लोकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाच्या सर्वच कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले एक खास स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे लोकांना या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. या कार्यक्रमातील लेखकाची भूमिका साकारणारे तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा हे देखील लोकांना खुप आवडतात आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची लोकांची खूप इच्छा आहे. त्यामुळेच आज आम्ही त्यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.
तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्या पत्नीच्या रूपात आपण अंजली भाभीला नेहमीच पाहिले आहे आणि त्या दोघांच्या जोडीला देखील लोकांकडून पसंती दर्शवली गेली आहे. परंतु त्यांच्या खऱ्या आयुष्यातील बायकोबद्दल फारच कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.
शैलेश लोढा यांच्या पत्नीचे नाव स्वाती लोढा आहे. स्वाती लोढा या दिसायला अंजली भाभीपेक्षा ही सुंदर आहे. परंतु असे असले तरी अभिनयाच्या जगाशी त्यांचा काही संबंध नाही. स्वाती उच्च शिक्षित आहे. स्वाती यांनी मॅनेजमेंटच्या क्षेत्रात पीएचडी केली आहे.
शैलेश लोढा यांची पत्नी स्वाती लोढा ही केवळ मॅनेजमेंट स्कॉलरच नाही, तर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्या एक लेखिकाही आहे. स्वाती सामाजिक कार्यांनाही हातभार लावतात.
शैलेश लोढा यांच्या पत्नी स्वाती लोढा यांनी शैलेश लोढा यांना त्यांच्या लेखनात मदत करतात. जेव्हा शैलेश त्यांचे त्यांचे पहिले पुस्तक लिहित होते तेव्हा स्वातीने त्यांना मदत केली.
शैलेश लोढा यांची पत्नी स्वाती लोढा या पालकत्व या विषयावर लोकांना प्रेरणा देता आहेत. त्या सोशल मीडियावर पालकत्वाशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतात. तसेच, त्यांनी अलिकडच्या काळात आपली मुलगी स्वराच्या मदतीने एक पुस्तक लिहिले, ज्याचे नाव आहे '54 Reasons Why Parent's Suck! आहे.
शैलेश आणि स्वाती दोघेही सोशल मीडियापासून तसे दूरच असतात. त्यांची मुलगीही अद्याप सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही.