आयरा बॉयफ्रेन्डसोबत करते शॉपिंग ; ट्रोलर्सकडून वाईट शब्दात शेरेबाजी

बॉयफ्रेन्डसोबत इराचा हा व्हिडिओ व्हायरल...

Updated: Jul 7, 2021, 02:22 PM IST
आयरा बॉयफ्रेन्डसोबत करते शॉपिंग ; ट्रोलर्सकडून वाईट शब्दात शेरेबाजी

मुंबई : बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव (Kiran Rao) यांचा 15 वर्षांचा संसार संपला आहे. आमिर आणि किरणने एकमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. आमिरचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत झालं. त्याचं पहिलं लग्न देखील सुद्धा फक्त 15 वर्ष टिकलं.  आमिर आणि पहिली पत्नी रीना यांना दोन मुलं आहेत. रीना आणि आमिरची मुलगी आयरा कायम चर्चेत असते. कधी तिच्या पोस्टमुळे तर कधी नुपुर शिखरे,सोबत असलेल्या तिच्या रिलेशनमुळे. आता देखील आयराला तिच्या बॉयफ्रेन्डसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आमिर आणि किरणच्या घटस्फोटानंतर आयरा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत शॉपिंग करताना दिसली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  प्रसिद्ध पॅपराजी विरल भयानीने आयरा आणि नुपुरचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिला अनेकांनी ट्रोल देखील केलं आहे. व्हिडिओमध्ये आयरा आणि नुपुर एकमेकांचा हात पकडून  चालताना दिसत आहेत. 

आयराच्या हातात शॉपिंग बॅग आहेत.  दोघांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक युझर म्हणला, 'आयरा आता तिच्या वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी करत आहे.'  दरम्यान आमिर आणि किरण यांच्या घटस्फोटानंतर आयराने एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. 'पुढचा रिव्ह्यू उद्या... पुढे काय होणार आहे?' असं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. तेव्हा देखील तिच्या या पोस्टने सर्वांना गोंधळात टाकलं होतं.