Gangubai Kathiyawadi 100 कोटींच्या टप्प्यावर; रणबीरलाही वाटतोय आलियाचा अभिमान

आलिया भट्ट-स्टारर गंगूबाई काठियावाडी लवकरच १०० करोडच्या घरात पोहचणार आहे. 

Updated: Mar 7, 2022, 03:53 PM IST
Gangubai Kathiyawadi 100 कोटींच्या टप्प्यावर; रणबीरलाही वाटतोय आलियाचा अभिमान  title=

मुंबई : आलिया भट्ट-स्टारर गंगूबाई काठियावाडी लवकरच १०० करोडच्या घरात पोहचणार आहे. सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक आलिया भट्टच्या या सिनेमाला खूप पसंती देत आहेत.  ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने ट्विट करत लिहीलं आहे की,  गंगूबाई सगळे रेकॉर्ड मोडत आहे. आणि लवकरच 100 करोडच्या क्लबमध्ये शामिल होत आहे.  सिनेमाने रिलीजच्या ९व्या दिवशी म्हणजेच शनिवारपर्यंत 7.50 करोड रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आतापर्यंत 78.50 करोड रुपयांची कमाई केली आहे. अशामध्ये बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार १० व्या दिवशी म्हणजेच रविवारी देखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आलियाच्या या यशानंतर रणबीरलाही तिचा हेवा वाटत आहे.

10व्या दिवशी 8 ते 9 कोटींचा व्यवसाय केल्यानंतर हा चित्रपट लवकरच 100 कोटी क्लबमध्ये सामील होऊ शकतो. असं मानलं जात आहे. त्याचबरोबर, संजय लीला भन्साळी यांच्या म्हणण्यानुसार, वर्ल्डवाईड या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, हुसेन जैदी यांचं गंगूबाई काठियावाडी पुस्तक मुंबईच्या माफिया क्वीन्सच्या चरित्रावर आधारित आहे. चित्रपटात आलिया भट्टशिवाय अजय देवगण, पार्थ समथान, शंतनू माहेश्वरी आणि सीमा पाहवा यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. तर या सिनेमात अजय देवगणचा कॅमिओ आहे.

आलिया भट्ट या चित्रपटात गंगा जगजीवनदास काठियावाडच्या भूमिकेत दिसत आहे. जी मुंबईला जाण्याचं स्वप्न पाहते, मात्र हिरोईन बनण्याचं स्वप्न दाखवून तिला विकलं जातं. मग बरेच दिवस भुकेलं आणि तहानलेलं राहून लोकं तिचं नाव गंगू ठेवतात. यानंतर ती आपल्या जुन्या आयुष्याचा निरोप घेते. यानंतर नव्या आयुष्याला ती सुरुवात करते. मग तिला प्रेम आणि आदर मिळतो. त्यानंतर ती 4000 महिला आणि मुलांसाठी लढते.