बायको माहेरी चालल्याचं पाहून रितेशच्या आनंदाला उधाण; याला तुम्ही काय म्हणाल?

सोशल मीडियावरही ही जोडी कायमच त्यांचं नातं अतिशय सुरेखपणे सर्वांसमोर आणत असते

Updated: Mar 7, 2022, 03:43 PM IST
बायको माहेरी चालल्याचं पाहून रितेशच्या आनंदाला उधाण; याला तुम्ही काय म्हणाल?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा मेळ साधणारी एक सेलिब्रिटी जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनीलिया डिसुझा. रितेश आणि जिनीलियाची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन अशा दोन्ही केमिस्ट्री कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेते. 

सोशल मीडियावरही ही जोडी कायमच त्यांचं नातं अतिशय सुरेखपणे सर्वांसमोर आणत असते. पण, आता म्हणे रितेशची 'बायको' माहेरी गेलीये आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

रितेशनं एक रील शेअर केला आहे, जिथं तो पत्नी माहेरी गेल्याचं म्हणत चक्क नाचताना दिसत आहे. 

सहसा पत्नी माहेरी जात नाही, म्हणून रडणारे आणि ती माहेरी गेली म्हणून बेफाम नाचणारे ते हेच वाटतं... याचीच प्रचिती रितेशचा हा व्हिडीओ पाहताना येत आहे. 

रितेशनं हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यावर अनेक लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आपल्या ग्रुपमध्ये कायम एक असा मित्र असतो, जो त्याची पत्नी माहेरी जाण्याची वाट पाहत असतो. याचा अर्थ असा नसतो की त्याला या नात्याचा कंटाळा आला आहे. 

पण, त्याच्या या अशा वागण्यातून नात्यातील खोडकरपणा समोर येतो. रितेशचा हा व्हिडीओ जिनीलिया आणि त्याच्या नात्यात असणारा हाच खोडकरपणा अधोरेखित करतो.