Gangubai Kathiawadi Review: 'कुंवारी आपने छोड़ा नहीं, श्रीमती किसी ने बनाया नहीं..', गंगूबाईचा खडतर प्रवास

वेश्या व्यवसाय करण्याऱ्या महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या गंगूबाई.... 'गंगूबाई काठियावाडी...'  

Updated: Feb 25, 2022, 01:39 PM IST
Gangubai Kathiawadi Review:  'कुंवारी आपने छोड़ा नहीं, श्रीमती किसी ने बनाया नहीं..', गंगूबाईचा खडतर प्रवास title=

Gangubai Kathiawadi Review : समाजात स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी अनेक महिलांना संघर्षांचा सामना करावा लागतो.. अशाचं महिलांपैकी एक म्हणजे गंगूबाई... गंगूबाई यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर इतर महिलांच्या हक्कांसाठी देखील लढा दिला... गंगूबाई यांनी देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना न्याय मिळवून दिला... वेश्या व्यवसाय करण्याऱ्या महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या, त्यांच्या मुलांसाठी अनेकांसोबत लढणाऱ्या गंगूबाई.... त्यांची कथा म्हणजे 'गंगूबाई काठियावाडी...'

सिनेमाची कथा...
गंगा जीवनदास काठियावड नावाची एक मुलगी... रमणीक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते... बॉलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचं स्वप्न उराशी घेवून रमणीकसोबत मुंबईत येते... तो दिवस आणि ती  गंगाची गंगू होते.... त्यानंतर गंगूची गंगूबाई... 

मुंबईत रमणीक गंगाला 1000 रुपयांत विकतो... तेव्हा अनेक दिवस गंगा अंधारात राहते... पण अखेर तिला बाहेर यावं लागतं आणि वेश्या व्यवसाय करावा लागतो... पहिला कस्टमर येतो आणि तिला गंगू नाव देवून निघून जातो...

अशाप्रकारे गंगाचं रुपांतर गंगूमध्ये होतं आणि तिचा खडतर प्रवास सुरू होतो...   या प्रवासात गंगू जशी पुढे जाते... तसे तिला नवे लोक भेटतात... वाट्यावा पुन्हा प्रेम आणि सन्मान मिळतो... 

प्रेम आणि सन्मानाच्या आधारावर त्यांची लढाई सुरु होते... गंगूने रेड लाईट एरियामधील 4 हजार महिला आणि त्यांच्या मुलांसाठी आयुष्यभर लढा दिला... लढ्यानंतर गंगूचं रुपांतर गंगूबाईमध्ये होतं..

आलियाचं अभिनय
बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी आलियाने गंगूबाई भूमिकेला योग्य न्याय दिला. खरं तर भूमिका तिच्यासाठी एक आव्हान होतं. भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आणि रुपेरी पडद्यावर तिची मेहनत दिसून आली. सिनेमात तिने उत्तम अभिनय केला आहे. आलिया गंगूबाई भूमिकेसाठी बेस्ट आहे, असं म्हणायला हरकत नाही... 

अभिनेता अजय देवगण रहीम लाला भूमिकेला योग्य न्याय देताना दिसला... तर दुसरीकडे अभिनेता शांतनू माहेश्वरीचा बॉलिवूड डेब्यू जोरदार ठरला...  डोळ्यातून त्याने आलियासोबत केलेल्या रोमान्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. 

त्यानंतर कामाठिपुरातील प्रेसिडेंटच्या भूमिकेत विजय राजच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. हुमा कुरैशी देखील कैमियोमध्ये दिसली. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा आहे. 

सिनेमेटोग्राफी, बॅकग्राउंड स्कोर, म्युझिक 
संजय लिला भंसाळी यांनी 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा एका वेगळ्या अंदाजात दिग्दर्शित केलाय. सिनेमातील सिनेमेटोग्राफी, बॅकग्राउंड स्कोर, म्युझिक आणि डान्स भन्नाट आहे. 

सिनेमात अनेक भावूक क्षण आहेत... वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचं आयुष्य... त्यांच्या आयुष्यात येणारी संकटं... ऐकाव्या लागणाऱ्या शिव्या... कुटुंबातील सदस्य कधीही दिसत नसल्याचं दुःख... या सर्व गोष्टी दिग्दर्शकाने उत्तम रित्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.