Gauahar Khan पतीला घेऊन गेली तुर्कीत, कारण...

 तिने तुर्की सहलीतील काही संस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Updated: Oct 17, 2021, 06:23 PM IST
Gauahar Khan पतीला घेऊन गेली तुर्कीत, कारण...

मुंबई : गौहर खान काही दिवसांपूर्वी पती जैद दरबारसोबत तुर्की आणि दुबईच्या सहलीवर होती. आता गौहरने तिथले फोटो पोस्ट केले आहेत. तिने तुर्की सहलीतील काही संस्मरणीय क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

फोटोत दोघेही ड्रिंकचा आनंद घेताना दिसत आहेत, दोघांचा रोमॅन्टिक अंदाजात या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे, यादरम्यान जैद सेल्फी घेत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 

लुक्सबद्दल बोलायचे झाले तर, गौहरने ब्लॅक जॅकेट आणि टाय-डाई पॅंट घातली आहे. ती या राईडमध्ये जाण्यासाठी खूप उत्साही दिसते आहे. दोघेही मुंबईला परतले आहेत. 

याआधी गौहरने दुबईहून काही फोटो पोस्ट केले होते. ज्यात ती डॉल्फिनसोबत पोहताना दिसत होती.