मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुखची पत्नी गौरी खान (Shahrukh Khan's Wife Gauri Khan) ही लोकप्रिय इंटेरिअर डिझायनरपैकी एक आहे. गौरी जेव्हा ही कोणत्याही पार्टीमध्ये हजेरी लावते तेव्हा तिचा लूक हा चर्चेचा विषय ठरतो. नुकतीच गौरीनं 'कॉफी विथ करण'मध्ये (Koffee With Karan 7) हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत तिच्या मैत्रिणी महीप कपूर (Maheep Kapoor) आणि भावना पांडे (Bhavna Panday) या देखील पोहोचल्या होत्या. दरम्यान, गौरीचा ड्रेस हा चर्चेचा विषय ठरला आहे.
गौरीनं शोमध्ये को-ऑर्ड सेट परिधान केला होता. यावेळी गौरीनं लेसचा टॉप परिधान केला आहे. या काळ्या रंगाच्या टॉपची V नेकलाइन आहे. यासोबत गौरीनं गुलाबी रंगाचं प्रिंटेड क्रॉप ब्लेजर आणि स्कर्ट परिधान केलं आहे. गौरीचा हा को-ऑर्डर सेट Alessandra Rich या ब्रँडचा आहे. (Gauri Khan's Dress Price Is In Lakhs) ज्याची किंमत अधिकृत वेबसाइटवर 2,90,700 रुपये आहे. ज्यात जॅकेटची किंमत 1,93,800 रुपये आणि स्कर्टची किंमत 96,900 रुपये होती. गौरीनं तिचा लुक पूर्ण करण्यासाठी लक्झरी ब्रँड Christian Louboutin ची हील्स घातली होती. (Gauri Khan Stylish Look In Koffee With Karan Printed Blazer with Mini Skirt and Lace Top Price in Lakhs)
दरम्यान, शोमध्ये गौरीनं आर्यनच्या अटकेवर पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे. करण गौरीला म्हणाला, तो काळ शाहरुखसाठी खूप कठीण होता. केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिकरित्याही जे काही घडले. तुला एक आई म्हणून आणि शाहरुखला एक वडील म्हणून मी ओळखतो. आपण एक कुटुंब आहोत. हे सगळं काही सोपे नव्हतं. पण, या परिस्थितीला कशा प्रकारे सांभाळलंस?
करणच्या प्रश्नावर उत्तर देत गौरी म्हणाली, 'होय, एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे कठीण काळातून गेलो, त्यापेक्षा वाईट काहीही नसू शकतं. जे घडलं ते एक आई आणि पालक म्हणून बघनं यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. प्रत्येकव्यक्ती आमच्यावर प्रेम करतो. आमचे मित्र आणि त्यांच्याशिवाय ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही त्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. इतकं प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्याने आम्ही धन्य आहोत. या काळात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांची मी नेहमीच आभारी आहे.’ (Gauri Khan Opens About Son Aryan Khan Drugs Case Arrest Says Nothing Can Be Worse)