Gautami Patil Video : सोशल मीडियावर नेहमीच डान्समुळे चर्चेत राहणारी डान्सर म्हणजेच गौतमी पाटील. गौतमीचे लाखो चाहते आहे. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षक गर्दी करताना दिसतात. तिच्या चाहत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच गौतमी ही दहीहंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. त्या कार्यक्रमात गौतमीला पाहण्यालाठी लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. त्यानंतर गौतमी पुन्हा एदा एका कार्यक्रमात दिसली. मात्र, यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण तिचा डान्स नाही आहे. तर या कार्यक्रमात गौतमी डान्स करताना पडली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरली आहे.
गौतमीनं सांगली जिल्ह्यातील तरुण भारत स्टेडियम येथे पार पडलेली दहीहंडी स्पर्धेत हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील गोविंदा पथकांनी ज्या प्रकारे थर रचत हंडी फोडली ते पाहण्या जोगं होतं. यामध्ये तासगावच्या शिवगर्जना गोविंदा पथकाने 7 थरांचा थरारक मनोरा रचत हंडी फोडून 1 लाख 11 हजाराचे बक्षीस पटकावलं. तर या दहीहंडीच्या निमित्ताने साथीदार फाउंडेशनच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मा पासून राज्यभिषेक पर्यंतचा पराक्रम नाट्याविषकर रूपात सादर केला. तर या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर डीजेच्या तालावर तरूणाई चांगलीचं थिरकली, दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी हजारो सांगलीकरांसह कामगार मंत्री सुरेश खाडे,भाजपा खासदार संजयकाका पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थितीत लावली होती. सांगली महापालिकेचे माजी सभापती धीरज सूर्यवंशी यांनी या भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते.
Gautami Patil | नाचता नाचता अचानक गौतमी पाटील स्टेजवर पडली, पाहा पूर्ण व्हिडिओ #gautamipatil #gautamipatildance #gautamipatililavni #marathinews pic.twitter.com/ALYP0CVWEL
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 11, 2023
दरम्यान, गौतमी स्टेजवर नाचत असताना अचानक स्टेजवर पडली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गौतमी पडल्यानंतर लगेच तिचे बाऊंसर आले आणि त्यांनी लगेच तिला उचललं. मात्र, त्यानंतर देखील गौतमीनं तिचा डान्स थांबवला नाही. गौतमी उभी राहिली आणि पुन्हा नाचू लागली.
हेही वाचा : 'बापाला जाऊन 4 दिवस झाले नाहीत आणि...', दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल
दरम्यान, या आधी गौतमी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. गौतमीनं दहीहंडीच्या निमित्तानं डान्स केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचं कारण हे वडिलांचे निधन झाल्यानंतर देखील तिनं सुपारी कॅन्सल केलं नाही. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. गौतमीला ट्रोल करत नेटकऱ्यांनी 'चार दिवस झाले नाही बाप मेला... आणि या ताई साहेब नाचायला लागल्या... त्याच दिवशी कॉमेंटमध्ये मी भविष्यवाणी केली होती... आज जरी हीचा बाप मेला तरी पण हिने एखाद्या दही हंडीची सुपारी घेतलेली असेल... आणि बघा...' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत तिला ट्रोल केले.