Gehana Vasisth लाइव स्ट्रीममध्ये न्यूड, VIDEO पाहून सगळेच हैराण

Live मध्ये चाहत्यांना विचारला प्रश्न?

Updated: Aug 3, 2021, 07:28 AM IST
Gehana Vasisth लाइव स्ट्रीममध्ये न्यूड, VIDEO पाहून सगळेच हैराण

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) चे पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात पॉर्नोग्राफी आणि त्याबाबतचे व्हिडीओ शूट करून ऍप्लिकेशनद्वारे स्ट्रीम करण्याचे आरोप केले आहेत. कोर्टात दोन्हीही पक्ष आपली बाजू मांडत आहेत. मात्र राज कुंद्रा यांचे वकिल न्यायालयात हेच सांगत आहेत की,'राज कुंद्रा जे काही करत आहेत ते इरोटिका या श्रेणीत येतं. त्यामुळे त्याला पॉर्न म्हणू शकत नाही.'

Nude होऊन केलं लाईव्ह 

राज कुंद्रा या प्रकरणात सगळेजण आपापली प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणात सर्वात महत्वाची असलेली अभिनेत्री मॉडेल गहना वशिष्ठ (Gehna Vasisth) चा एक व्हिडीओ समोर आला आहे. गहनाने हल्लीच इंस्टाग्रामवर एक न्यूड लाइव्ह केलं आहे. या लाईव्ह स्ट्रीम दरम्यान गहना न्यू़ड होती. हा व्हिडीओ वल्गर आहे का? असा सवाल थेट तिने युझर्सला विचारला. हा व्हिडीओ अतिशय व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

व्हिडीओत काय म्हणतेय गहना?

व्हिडिओमध्ये गेहना वशिष्ठ म्हणाली, 'नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी तुमच्या सर्वांसमोर न्यूड बसली आहे. मी असभ्य दिसत असल्यास मला सांगा. मी पॉर्न स्टार दिसत आहे का? किंवा मी पॉर्न कंटेंट करतेय असं दिसत आहे का? ' गहना वशिष्ठचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 

गहनाचा चाहत्यांना एक सवाल? 

गहना म्हणते की, 'माझा मुद्दा असा आहे की मी काहीही परिधान करत नाही पण तरीही तुम्ही ते पॉर्नच्या श्रेणीत मोजत नाही. आणि माझे बाकीचे व्हिडिओ ज्यात मी चांगले कपडे घातले आहेत, तरीही तुम्ही त्यांना अश्लील म्हणत आहात. ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की पॉर्न शूट केले जाते, पॉर्न शूट केले जाते. आत्ता मी एकही कपडा घातलेला नाही, पण तरीही तुम्ही म्हणताय की मी वल्गर नाही. '