तू व्हर्जिन आहेस? या प्रश्नावर टायगर श्रॉफचं उत्तर....

या प्रश्नाचं उत्तर देताना टायगरने स्वतःची तुलना या अभिनेत्यासोनबत केली 

Updated: Aug 3, 2021, 07:15 AM IST
तू व्हर्जिन आहेस? या प्रश्नावर टायगर श्रॉफचं उत्तर....

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ज्याप्रमाणे आज टायगरने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, ती लवकर कोणाला कमावता येत नाही. इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी इमेज असणार टायगर सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. तसं पाहायला गेलं तर टायगर त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांच्या फार कमी उत्तर देतो. पण अभिनेता अरबाज खानच्या शो 'पिंच'मध्ये टायगरने चाहत्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर दिलं. 
 
यावेळी पदार्पण केल्यानंतर आलेला अनुभव टायगरने सांगितला. टायगर जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा त्याची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. कारण त्याला दाढी नव्हती. दाढी नसल्यामुळे लोक मला विचारायची हा हिरो आणि की हिरोईन. टायगर या शोमध्ये अनेक प्रश्नांची उत्तर दिली. 

त्यानंतर टायगरला सोशल मीडियाच्या माध्यमातून, 'तु व्हर्जिन आहेस का?' असा प्रश्न विचारला. तेव्हा टायगर म्हणाला, 'मी अभिनेता सलमान खान प्रमाणे व्हर्जिन आहे. ' टायगरच्या या उत्तरावर अरबाजला हसू आवरलं नाही. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

सांगायचं झालं तर,  टायगर आणि अभिनेता दिशा पाटनी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक ठिकाणी किंवा कार्याक्रमांमध्ये आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील तुफान रंगल्या होत्या. पण यावर दिशा आणि टायगरने कोणत्याही खुलासा केलेला नाही.