'आम्ही मुली जिभेवर ठाम असतो' असा दावा जिनेलिया का करतेय?

जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Updated: Nov 23, 2021, 09:08 PM IST
'आम्ही मुली जिभेवर ठाम असतो' असा दावा जिनेलिया का करतेय?  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूजा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.  जेनेलिया अनेकदा तिचे फनी व्हिडिओ शेअर करत असते. जेनेलिया चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते आणि त्यांचं भरपूर मनोरंजन करते. या क्रमात जेनेलियाचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये जेनेलिया तिचं वय सांगताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये जेनेलिया एक डायलॉग बोलत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती तिला तिचं वय विचारतो, ज्यावर अभिनेत्रीने तिचं वय 22 वर्षे सांगितलं. मग ती व्यक्ती म्हणते की, 5 वर्षांपूर्वीही तिनं तिचं हेच वय सांगितलं होतं. ज्यावर जेनेलिया म्हणते, 'आम्ही मुली जिभेवर ठाम असतो'. 

जेनेलिया डिसूजाचा हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडतो आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या पोस्टला आतापर्यंत ४ लाख ५३ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ शेअर करत जेनेलियाने कॅप्शन दिलं आहे की, 'मुली नेहमीच तरुण असतात. यावर तिची मैत्रिण कांची कौल हिने 'आणि लुक्समध्येही' अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे जेनेलियाच्या पोस्टवर लोकं प्रेमाचा वर्षाव करत आहेत.