जॉर्जिया एंड्रियानीचा जबरदस्त डान्स, VIDEO आला समोर

खरंच जॉर्जिया एंड्रियानीने जंगलात डान्स केलाय, तुम्ही पाहिलात का VIDEO?

Updated: Sep 19, 2022, 10:08 PM IST
जॉर्जिया एंड्रियानीचा जबरदस्त डान्स, VIDEO आला समोर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Georgia Andriani)  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच एक व्हिडिओ (Georgia Andriani Video) तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जंगलात डान्स करताना दिसत आहेत. हा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओत काय? 
जॉर्जिया एंड्रियानीने (Georgia Andriani) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जंगलात तुफान डान्स करताना दिसत आहे. वनपीस घालून तिने हा डान्स केला आहे.विशेष म्हणजे ती जंगलात न घाबरता डान्स करतेय. या व्हिडिओत ती पावसात किलर डान्स मुव्हस करत नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओत तिचा प्रचंड व्हायरल होत आहेत. तसेच अनेक प्रेक्षकांच्या तो पसंतीस उतरला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

लुकची चर्चा 
व्हिडिओत जॉर्जिया एंड्रियानी (Georgia Andriani Video) रेड कलरचा वनपीस घातला आहे. या वनपीसमध्ये तिने कंबरेला जॅकेट गुंडाळले आहे. तर तिचा हा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस खुले सोडले आहेत. हा तिचा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

जॉर्जिया एंड्रियानीचा (Georgia Andriani Video)  हा लेटेस्ट डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. जॉर्जियाच्या या व्हिडिओला चाहते प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.जॉर्जियाचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक व्हिडिओने धुमाकुळ घातला आहे. जॉर्जियाचा हा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे.