प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉस शोमध्ये मारणार एन्ट्री, जाणून घ्या ती कोण आहे?

MMS स्कँडल...विवाहित अभिनेत्यासोबत अफेअर...रस्त्यात मारहाण...ही अभिनेत्री मारणार बिग बॉसच्या शोमध्ये एन्ट्री 

Updated: Sep 19, 2022, 08:52 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्री बिग बॉस शोमध्ये मारणार एन्ट्री, जाणून घ्या ती कोण आहे?  title=

मुंबई : बिग बॉस 16 (bigg boss 16) या शोचा नुकताच प्रोमो रीलीज झाला होता. या प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली होती. त्यात  आता या बिग बॉस (bigg boss) शोमध्ये सहभागी होणाऱ्या कंटेस्टंटची नावे समोर आली आहेत. यामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. ही अभिनेत्री एमएमएस कांड आणि विवाहित अभिनेत्यासोबत अफेअरमध्ये अडकली होती. नेमकी ही अभिनेत्री कोण आहे? व नेमक्या कोणत्या कोणत्या वादात ती सापडली आहे ते जाणून घेऊयात. 
   
बिग बॉस 16 (bigg boss 16) हा शो यावर्षी 1 ऑक्टोबरपासून टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोपुर्वी काही कंटेस्टंटची नावे समोर आली आहेत. यामध्ये अभिनेत्री प्रकृती मिश्रा हिचे नाव समोर आले आहे. प्रकृती मिश्रा सलमान खानच्या (salman khan) बिग बॉस 16 या शोमध्ये दिसणार आहे. ही अभिनेत्री एमएमएस कांड आणि विवाहित अभिनेत्यासोबत अफेअर या प्रकरणामुळे वादात सापडली होती. या वादामुळे ती चर्चेत आली होती. 

अफेअरमुळे अडकली वादात
गेल्या जुलै महिन्यात प्रकृती मिश्रा (prakruti mishra) खूप चर्चेत आली होती. प्रकृतीचे एका विवाहित अभिनेत्यासोबत अफेअर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या प्रकरणात अभिनेत्याच्या पत्नीने दोघांनाही पकडून रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. 

एमएमएस कांड काय होता?
प्रकृती मिश्राचा (prakruti mishra)  एक खाजगी व्हिडिओ लीक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या एमएमएस स्कँडलमुळे (mms scandal) तिचे नाव चर्चेत आले होते. त्यामुळे या एमएमएस कांडमुळे ती वादात सापडली होती. 

कोण आहे ही अभिनेत्री?
प्रकृती मिश्रा (prakruti mishra) ही ओरिया चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने टीव्हीपासून ओरिया सिनेमापर्यंत बरेच काम केले आहे. प्रकृतीने वयाच्या पाचव्या वर्षी ‘सबता माँ’ या ओडिया चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. ती झी टीव्हीच्या इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स दिसली होती. याशिवाय, प्रकृती 'एस ऑफ स्पेस सीझन 2' या शोची स्पर्धक होती. 

दरम्यान प्रकृती मिश्रा (prakruti mishra) बिग बॉस 16च्या शोमध्ये दिसणार असल्याने, या सीझनमध्ये मोठा वाद पाहायला मिळणार आहे.