लग्नानंतर अभिनेता पत्नीसोबत पोहोचला सेटवर आणि घडलं असं काही...

 रोमँटिक फोटो शेअर केले होते.

Updated: Dec 7, 2021, 04:28 PM IST
 लग्नानंतर अभिनेता पत्नीसोबत पोहोचला सेटवर आणि घडलं असं काही...

मुंबई : टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा आणि अभिनेता नील भट्ट लग्नानंतर शूटिंगला परतले आहेत. ऐश्वर्या-नीलने काही दिवसांपूर्वीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

ऐश्वर्या आणि नीलने उज्जैनमध्ये लग्न केले आणि मुंबईत रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीत टीव्ही इंडस्ट्रीसोबतच फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सही पोहोचले होते. आता या जोडप्याचे 'गुम है किसीके प्यार में'च्या सेटवर जोरदार स्वागत करण्यात आले आहे. दोघांनीही आपापल्या सोशल मीडिया हँडलवर त्याचा फोटो शेअर केला आहे.

neil bhatt and aishwarya sharam

सेटवर सेलिब्रेशन नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये या जोडप्याचे सेटवर कसे स्वागत झाले. 'गुम है किसीके प्यार में'च्या टीमने या जोडप्यासाठी केकही आणला होता.ऐश्वर्या-नीलने मिळून हा केक कापला.

neil and aishwarya

या खास प्रसंगी शोची सर्व स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्स उपस्थित होते. सेटचा फोटो पोस्ट करत नील भट्टने कॅप्शनमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. या जोडप्याला कामावर परतताना पाहून चाहते खूश आहेत, हे पोस्टवर केलेल्या कमेंट्सवरून कळते.

neil bhatt and aiswarya

स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्ससोबत क्लिक केलेला फोटो या खास प्रसंगी नील भट्ट सेमी फॉर्मल ड्रेसमध्ये दिसला, तर ऐश्वर्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्रामवर स्टारकास्ट आणि क्रूचा फोटो देखील शेअर केला आहे. कपलने रोमँटिक फोटो शेअर केले  यापूर्वी ऐश्वर्या शर्माने नीलसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले होते.