कतरिनाच्या लग्नात रणबीरला 'गळा काढता' येणार नाही

त्याच्या आठवणीही नको... 

Updated: Dec 7, 2021, 04:18 PM IST
कतरिनाच्या लग्नात रणबीरला 'गळा काढता' येणार नाही
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल सध्या जयपूरमध्ये त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी पोहोचले आहेत. तिथं पोहोचल्या क्षणापासून या जोडीच्या लग्नसमारंभांना दणक्यात सुरुवात झाली. संगीत, मेहेंदी, हळद आणि मग विवाहसमारंभ अशी या कार्यक्रमाची रुपरेषा आहे. (Katrina kaif vicky kaushal)

सर्वच बाबतीत या लग्नाची तयारी अखेरच्या टप्प्यात आली आहे. ज्यानंतर आता म्हणे या लग्नात एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच मोठा निर्णय घेतला गेला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार कतरिना आणि विकी त्यांच्या संगीतसोहळ्यामध्ये 'तेरी ओर' या गाण्यावर थिरकणार आहेत. इतरही मंडळी इथं त्यांचे परफॉरर्मन्स देणार आहेत. 

असं असलं तरीही या संपूर्ण सोहळ्यामध्ये कुठेच रणबीर कपूरचं कोणतंही गाणं वाजणार नाही. 

बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक गाजलेली गाणी त्यांच्या संगीत सोहळ्यामध्ये वाजणार आहेत. पण, रणबीरच्या गाण्यांना इथं डच्चू देण्यात आला आहे. 

कतरिना आणि विकीच्या संगीत सोहळ्यात 'ब्लिंग' अशी थीम असणार आहे. इथं वर आणि वधू पक्षामध्ये जुगलबंदीही असणार आहे. 

सारंकाही परफेक्ट सुरु असताना कुठेही भूतकाळाचा लवलेशही नको, यासाठीच सक्तीनं रणबीरची गाणी यावेळी टाळली जाणार आहेत. 

कतरिना आणि रणबीर बराच काळ एकमेकांना डेट करत होते. काही काळासाठी ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. पण, पुढे या जोडीचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्यामध्ये असणारा दुरावा कायम ठेवला.