'दारू बदनाम करती' गाण्यावर तरुणीच्या डान्स व्हिडिओचा इंटरनेटवर धुमाकूळ

Updated: Jun 2, 2018, 08:46 AM IST

मुंबई : पंजाबी सिंगर कमल कहलोन आणि परम सिंह यांचं 'दारु बदनाम करती' हे गाणं सध्या खूपच गाजत आहे. जवळपास सर्वच पार्टीजमध्ये हे गाणं ऐकायला मिळत आहे. हे गाणं युट्यूबवर आतापर्यंत २२ कोटींहून अधिकवेळा पाहिलं आहे. इतकचं नाही तर या गाण्याची क्रेझ तरुणाईवर इतकी आहे की अनेकजण या गाण्यावर डान्स करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करत आहेत. अशाच प्रकारे एका तरुणीने केलेल्या डान्सचा व्हिडिओ युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.

dance story
Image: Video Grab Youtube

हा व्हिडिओ Obsessive Dancing Disorder नावाने एका युट्यूब चॅनलने अपलोड केला आहे. या व्हिडिओत 'दारु बदनाम करती' गाण्यावर एक तरुणीने जबरदस्त डान्स केला आहे. या तरुणीच्या डान्स स्टेप्सही अनेकांना आवडत आहेत. त्यामुळेच कदाचित २७ एप्रिल रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २२ लाखांहून अधिक वेळा पाहिलं आहे.

(हे पण पाहा: व्हिडिओ: 'दारू बदनाम करती' गाण्यावर तरूणीचे ठुमके)

इतकचं नाही तर या व्हिडिओवर ३००० हून अधिक कमेंट्स आणि २४ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.