कॅटरीनाला टक्कर देतेयं ही तरुणी, व्हिडिओ व्हायरल

 ६ दिवसांच्या आत १८ लाखांपेक्षा अधिकवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. यावर भन्नाट प्रतिक्रीयाही व्ह्यूअर्सनी दिल्या आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 2, 2017, 01:03 PM IST
 कॅटरीनाला टक्कर देतेयं ही तरुणी, व्हिडिओ व्हायरल  title=

मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानचा आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है' २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

'स्वॅग से स्वागत' हिट

सिनेमा येण्याआधीच यातील 'स्वॅग से स्वागत' हे गाणे मोठ्या प्रमाणात हिट झाले आहे. यामध्ये सलमानसोबत कॅटरीनाही जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 

गाण्याची क्रेझ 

एवढच नव्हे, या गाण्याची क्रेझ इतकी वाढलीए की, तरुणांनीही या गाण्यावरचा आपला डान्स व्हिडिओ अपलोड करायला सुरूवात केली आहे. 

२६ तारखेला अपलोड 

Olga Dancer73il नावाच्या युट्यूब चॅनलने एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यामध्ये एक तरूणी जबरदस्त डान्स परफॉर्मन्स देत आहे.

गेल्या महिन्याच्या २६ तारखेला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे. 

 १८ लाखांपेक्षा अधिक व्ह्यू

 ६ दिवसांच्या आत १८ लाखांपेक्षा अधिकवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. यावर भन्नाट प्रतिक्रीयाही व्ह्यूअर्सनी दिल्या आहेत.

कॅटरीनाच्या या डान्सला वेगळ्या पद्धतीने या व्हिडिओत सादर करण्यात आले आहे. त्यामूळे तो लोकांच्या पसंतीस पडत आहे.