मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाचा (Govinda) भाचा कृष्णा हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. याशिवाय गोविंदा आणि कृष्णा यांच्यात होणाऱ्या वादात कृष्णाची पत्नी कश्मीरा ही तिचं मत मांडताना दिसते. अभिनेत्री कश्मीरा शाहला (Kashmera Shah) बॉलिवूडची सर्वात बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जरी ती चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून आपलं स्थान निर्माण करू शकली नसली तरी बड्या स्टार्ससोबत दिसणारी कश्मिरा बी-टाऊनमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. अलीकडे कश्मीरा शाह तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये खूप व्यस्त होती. कश्मिरानं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
कश्मिरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कश्मिरानं पूलच्या बाजूला बिकिनीमध्ये बोल्ड पोज दिल्या आहेत. कश्मिराचा हा व्हिडीओ फोटो शूटमधला आहे. याआधीही कश्मिरानं तिच्या फोटोंनी खळबळ उडवली होती. मात्र, यावेळी तिनं कहर केली आहे. (Govinda s daughter in law and krishna s wife kashmera shah bikini photo viral)
कश्मिराच्या या बोल्ड स्टाइलचे कौतुक करताना काही नेटकरी थकत नाही आहेत, तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. अलीकडेच बिग बॉस 10 मध्ये आलेल्या साजिद खानला कश्मिरा शाहनं काय सपोर्ट केल्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कश्मिरानं एक ट्विट केलं होतं यात ती म्हणाली, 'तिला साजिद खानची विनोदी शैली आणि त्याचा प्रामाणिकपणा सर्वात जास्त आवडला. एवढंच काय, सोशल मीडियावर त्यावरून खळबळ उडाली आहे.' कश्मिराला ट्रोल करण्यासोबतच तिच्यावर नकारात्मक कमेंटही केल्या आहेत.