'फ्रायडे' तून हसून लोटपोट करणार गोविंदा

 'फ्रायडे' नावाच्या सिनेमातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आलयं. या सिनेमातून गोविंदा पुन्हा एकदा गुदगुल्या करणार आहे.

Updated: Mar 30, 2018, 09:09 AM IST
 'फ्रायडे' तून हसून लोटपोट करणार गोविंदा title=

मुंबई : गोविंदाचा आधीचा सिनेमा प्रेक्षकांवर काही जादू करू शकला नाही. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच आपटला. पण हार मानेल तो गोविंदा कसला ? पुन्हा नव्या उत्साहात तो दमदार एन्ट्री घेतोय. 'फ्रायडे' नावाच्या सिनेमातून तो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आलयं. या सिनेमातून गोविंदा पुन्हा एकदा गुदगुल्या करणार आहे. गोविंदाचे लागोपाठ २ सिनेमा काही जादू करू शकले नाही. पण आगामी सिनेमाची गोष्ट थोडी वेगळी आहे.

गोविंदा-वरूणची जोडी 

'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' मधून सर्वांना हसून लोटपोट करणारा अभिनेता वरूण शर्मा गोविंदासोबत दिसणार आहे. ज्या जॉनरमध्ये मला माझी जागा बनवायची आहे, गोविंदा त्या जॉनरमधला दिग्गज असल्याचे वरूण शर्मा याने सांगितले. गोविंदासोबत काम करताना खूप मज्जा आली आणि खूप काही शिकायला मिळाल्याचंही त्याने सांगितलं. 

अभिषेक डोगराचे दिग्दर्शन 

गोविंदाचा 'फ्रायडे' सिनेमा अभिषेक डोगराने दिग्दर्शित केलाय. याआधी त्याने सोनम कपूर आणि राजकुमार रावचा 'डॉली की डोली' सिनेमा दिग्दर्शित केलाय. गोविंदाचा 'फ्रायडे' सिनेमा ११ मे ला सिनेमागृहात येणार आहे.