Apna Time Aayega:'गली बॉय'चं गाणं रिलीज

गाण्याला युवापिढीकडून पसंती 

Apna Time Aayega:'गली बॉय'चं गाणं रिलीज  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्टचं आगामी सिनेमा 'गली बॉय'चं गाणं रिलीज झालं आहे. 'अपना टाइम आएगा' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात रणवीर सिंहचा अगदी हटके अवतार आहे. 

रणवीर सिंहच्या डोक्यात रॅपर होण्याचं खुळ दिसत आहे. अनेक प्रसंगांना तोंड देत तो या ध्येयापर्यंत पोहचू इच्छितो. त्याचा हा प्रवास या गाण्यात दाखवण्यात आला आहे. नुकताच रिलीज झालेला सिनेमा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडत असताना आता या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. 

हा सिनेमा 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून 2 मिनिटं 10 सेकंदाचं हे गाणं रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या आजूबाजूला फिरत आहे. या गाण्याला रणवीरनेच गायलं असून हे गाणं कंपोज केलं आहे डब शर्मा अॅण्ड डिवाइनने. या सिनेमाकरता रणवीर सिंहने रॅपर्सकडून रॅपचं ट्रेनिंग देखील घेतलं आहे. 

'गली बॉय' हा सिनेमा स्ट्रीट रॅपर विवियन फर्नांडिस आणि नावेद शेख यांच्या जीवनावर आधारित आहे. विवियन आणि नावेद मेरी गली में करता गाणं गातात. या सिनेमा दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे. या सिनेमात रणवीर अतिशय गरिब कुटुंबातील आहे. तर आलिया भट्ट मुस्लिम कुटुंबातील दाखवली आहे.

या सिनेमातून रॅपरचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. तरूणांना रणवीरचा हा लूक आणि त्याची स्टाइल अतिशय पसंत आली आहे. सिंबानंतर या सिनेमातून रणवीर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.