Arbaaz Khan ला सोडून जॉर्जियाने धरला या अभिनेत्याचा हात? व्हिडीओ समोर येताच खळबळ

Giorgia Andriani च्या आयुष्यात 'या' अभिनेत्याची एन्ट्री? अरबाजला सोडून धरला कोणाचा हात  

Updated: Nov 19, 2022, 10:44 PM IST
Arbaaz Khan ला सोडून जॉर्जियाने धरला या अभिनेत्याचा हात? व्हिडीओ समोर येताच खळबळ  title=

Gurmeet Choudhary-Giorgia Andriani New Song Video:   अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora)  घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan)  प्रसिद्ध मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) डेट करत आहे. अनेकदा दोघांचे फोटो आणि व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल झाले. पण आता जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजसोबत नाही तर, अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) सोबत दिसत आहे. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे जॉर्जियाच्या आयुष्यात नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्यासाठी निमित्त आहे त्यांचं नवीन गाणं. गुरमीत आणि जॉर्जियाचा नवीन म्यूझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गुरमीत आणि जॉर्जियाच्या नव्या गाण्याचं नाव 'दिल जिससे जिंदा है' असं आहे. यावर जॉर्जियाने भन्नाट  (Giorgia Andriani Dance) डान्स करुन चाहत्यांना थक्क केलं आहे. 

'दिल जैसे जिंदा है' या गाण्यासाठी गायक जुबिन नौटियालने (Jubin Nautiyal)  आवाज दिला आहे. हे गाणं इवानने दिग्दर्शित केलं असून टी-सीरीजने प्रदर्शित केलं आहे. सध्या जॉर्जिया आणि गुरमीतच्या नव्या गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. 

अरबाज आणि जॉर्जिया

नुकताच एका टॉक शोमध्ये अरबाजने जॉर्जियासोबत असलेल्या नात्याच्या खुलासा केला आहे. जॉर्जियामध्ये अशी कोणती गोष्ट होती जी अरबाजला प्रचंड आवडली याबद्दल अभिनेत्याने मोकळेपणाने सांगितलं आहे. 

अरबाज म्हणाला, 'जेव्हा तुम्ही कोणत्या नात्यामध्ये असाल, तर त्याबद्दल तुम्ही पुढचा विचार करत नाही. आमच्या नात्यात आम्ही एका अशा टप्प्यावर आहोत, जेथे आम्ही नातं कसं पुढे नेवू शकतो याचा विचार करत आहोत.' (giorgia andriani age)

जॉर्जियामधील ही गोष्ट अरबाजला प्रचंड आवडते
जॉर्जियाचा आनंदी स्वभाव अरबाजला प्रचंड आवडतो. जॉर्जिया आणि अरबाज कोरोना काळात  एकत्र होते. सोशल मीडियावर जॉर्जिया कायम अरबाजसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करायाची.  (giorgia andriani instagram)