2025 मध्ये एलियन मानवाशी डायरेक्ट संपर्क साधणार आणि... बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसची आश्चर्यकारक भविष्यवाणी

2025 मध्ये नमेकं काय घडणार याबाबत बाबा वेंगा आणि नास्त्रेदमस या दोघांची भविष्यवाणी चर्चेत आली आहे. एलियन मानवाशी डायरेक्ट संपर्क साधणार असल्याची भविष्यवाणी दोघांनी केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 6, 2025, 11:28 PM IST
 2025 मध्ये एलियन मानवाशी डायरेक्ट संपर्क साधणार आणि...  बाबा वेंगा आणि नास्त्रेदमसची आश्चर्यकारक भविष्यवाणी  title=

Baba Vanga And Nostradamus Predictions For 2025: एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक तर्क वितर्क मांडले जातात. अद्याप कोणीही एलियनच्या अस्तित्वाचा ठोस पुराव देऊ शकलेले नाही. अशातच प्रसिद्ध भविष्यवेत्या बाबा वेंगा आणि  नास्त्रेदमस या दोघांनी एलियनबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे.  2025 मध्ये  एलियन पहिल्यांदाच मानवांशी थेट संपर्क साधणार अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे. नास्त्रेदमसने हे भिकत वर्तवले आहे.

बाबा वेंगाची भविष्यवाणी   

2025 या वर्षाची सुरुवात विनाशकारी असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा याने केली आहे. 2025 वर्षात युरोपमध्ये मोठा संघर्षाला सुरुवात होईल अशी  भविष्यवाणी देखील बाबा वेंगाने केली आहे. यासह बाबा वेंगाने एलियनबाबातही भविष्यवाणी केली आहे. 2025 मध्ये पृथ्वीवर अपरिचीत प्राणी दिसतील. 2025 मध्ये  एलियन पहिल्यांदाच मानवांशी थेट संपर्क साधतील अशी भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे. टेलिपॅथीचा विकास होईल. याचा अर्थ टेलिफोन किंवा मोबाईल फोनची गरज भासणार नाही. मनुष्य एकाग्रतेने टेलीपॅथीद्वारे एकमेकांशी बोलू शकतील. यामुळे परस्पर संवादात क्रांतिकारक बदल घडू शकतात. 

हे देखील वाचा... 2025 वर्ष सुरु होण्याच्या 13 दिवस आधीच खरी ठरलीय बाबा वेंगाची भविष्यवाणी! हा फक्त योगायोग नाही

2025 पर्यंत युरोप खंडातील बहुतांश लोकसंख्या नष्ट होईल. सध्याच्या भू-राजकीय तणावाचा भविष्यात गंभीर परिणाम पहायला मिळेल.2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश होईल, ते जगासाठी संकटाचे वर्ष असेल अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे.   2043 पर्यंत युरोपात मुस्लिम राजवट लागू होईल अशी भविष्यवाणी देखील बाबा वेंगा याने केली आहे. 

नास्त्रेदमसची भविष्यवाणी

बाबा वेंगा प्रमाणेच  फ्रेंच भविष्यवेता  नास्त्रेदमस याने देखील 2025 मध्ये एलियन मानवाशी संपर्क साधणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. एलियन आणि मानव यांच्यात पहिला संपर्क प्रस्थापित झाल्यास विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती होईल.  ब्राझीलमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होईल. तसेच विनाशकारी पूराचे भाकीत नास्त्रेदमसने वर्तवले आहे. नास्त्रेदमसची भविष्यवाणी आतापर्यंत 70 टक्के खरी ठरलीय. नास्त्रेदमसने त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली आहेत.