‘झिम्मा २’चं चित्रपटगृहात अर्धशतक; 'हा' सिनेमा ठरला दुसरा यशस्वी मराठी चित्रपट

 हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. 

Updated: Jan 12, 2024, 08:10 PM IST
‘झिम्मा २’चं चित्रपटगृहात अर्धशतक; 'हा' सिनेमा ठरला दुसरा यशस्वी मराठी चित्रपट  title=

मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या चित्रपटाच्या कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. ५० दिवसांनंतरही चित्रपटगृहात ‘झिम्मा २’ हाऊसफुल्ल चालतोय. प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी अर्धशतक पूर्ण केले आहे. कलर यल्लो प्रॉडक्शनच्या सहकार्याने, जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘बाईपण भारी देवा’नंतर जिओ स्टुडिओजचा हा 2023 मधील दुसरा यशस्वी मराठी चित्रपट आहे. 

‘झिम्मा २’ ला मिळालेल्या प्रेमाबद्दलबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “झिम्मा २ चा हा प्रवास एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हता. प्रेक्षकांना प्रत्येक पात्राशी जोडण्याचा आणि ही कथा सगळ्यांना आपलीशी वाटावी, हा आमचा प्रयत्न यशस्वी ठरला. आज ५० दिवसांचा गाठलेला टप्पा आणि त्याच्या उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव केवळ ‘झिम्मा २’ चा नसून आपल्या सर्वांचा आहे. प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी ‘झिम्मा २’ ची संपूर्ण टीम मनापासून आभारी आहे.”

अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या जबरदस्त गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे तर या भन्नाट गाण्याला वैशाली सामंत आणि अपेक्षा दांडेकर यांच्या एनर्जेटिक आवाजाने चारचांद लावले आहेत.  इंदूच्या (सुहास जोशी)च्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने परदेशात रियुनियनसाठी निघालेल्या या सात मैत्रिणींचा प्रवास आता थोडा रंजक, थोडा भावनिक आणि थोडा हटके आहे.  

या सिनेमात प्रत्येक कलाकाराने सुंदर अभिनय केला आहे. या सिनेमात भली मोठी स्टार कास्ट आहे. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर अशी मोठी स्टारकास्ट आहे. यांच्यावर चित्रित झालेलं मराठी पोरी हे गाणे या सात जणींना या सहलीत पुन्हा एकदा स्वतःची एक वेगळी ओळख करून देतं. या सिनेमातील गाण्यांनेही प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  झिम्माप्रमाणेच आता झिम्माचा पुढचा भाग सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे.  नुकताच रिलीज झालेला हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लॉकडाऊनंतर रिलीज झालेला झिम्मा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं.