आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले

Mandatory Smoking Disclaimer On OTT: या दिग्दर्शकाने व्यक्त केलेल्या मतावरुन अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या असून काहींनी या दिग्दर्शकाची बाजू घेतली आहे तर काहींनी हा निर्णय अगदी बरोबर असल्याचं म्हणत दिग्दर्शकाला विरोध केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 27, 2023, 11:53 AM IST
आमच्या चित्रपट, मालिकांमधील धुम्रपानानेच लोक मरतात; हंसल मेहता OTT च्या 'त्या' नियमावर संतापले title=
सोशल मीडियावरुन लगावला टोला

Mandatory Smoking Disclaimer On OTT: प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका नियमावरुन सरकारी धोरणांवरुन निशाणा साधला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आता धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांसंदर्भातील इशारा देणं बंधनकारक करण्यात आल्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. हंसल मेहता यांनी याच वरुन उपहासात्मक पद्धतीने टीप्पणी करत 'हा निर्णय फारच पुढारलेला (काळाच्या पुढे विचार करणारा) निर्णय आहे', अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

फारच पुढचा विचार करुन निर्णय

हंसल मेहतांनी दिग्दर्शित केलेली स्कूप ही वेब सिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. 'स्कॅम 1992'च्या दिग्दर्शकांनी, "होय, केवळ आमच्या मालिका आणि चित्रपटांमुळेच तंबाखूचं सेवन करणारे आणि धुम्रपान करणारे मरण पावतात. आम्ही हा इशारा दिल्याने लोक निरोगी होतील आणि ते धुम्रपानही करणार नाहीत. फारच पुढचा विचार करुन घेतलेला निर्णय आहे," असा खोचक टोल लगावला आहे.

तंबाखूच्या दुष्परिणामाची जाणीव व्हावी म्हणून घेतलेले निर्णय

ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांबद्दलच्या इशारा स्क्रीनवर दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याचबद्दल एका मुलाखतीत दिलेल्या प्रतिक्रियाच्या वृत्ताला रिट्वीट करत हंसल मेहतांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "हा निर्णय लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि तंबाखूच्या दुष्परिणांची लोकांना जाणीव व्हावी म्हणून घेण्यात आला होता," असं हंसल मेहतांनी या मुलाखतीत म्हटलं होतं. मालिका आणि चित्रपटांबरोबर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेटमध्येही जिथे जिथे मद्यपान, धुम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन केलं जाणारी दृष्य असतील तिथे स्क्रीनवर इशारा दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यावरुनच मेहता यांनी या निशाणा साधला आहे.

लोकांची मतमतांतरे...

हंसल मेहतांच्या या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. चित्रपटांवर बंदी घालणं हे तंबाखूवर बंदी घालण्यापेक्षा सोपं असल्याने हे निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी टीका एकाने केली आहे. सरकार तंबाखूवरच बंदी का घालत नाही? असा प्रश्न अन्य एकाने विचारला आहे. "या निर्णयामुळे 100 किंवा 10 किंवा अगदी एका व्यक्तीनेही धुम्रपान सोडलं किंवा तंबाखू सोडली तर हा चांगला निर्णय आहे असं मी म्हणेन," अशी प्रतिक्रिया एकाने नोंदवली आहे. अन्य एकाने हंसल मेहता यांनी चित्रपटांचा प्रभाव लोकांवर फार असतो. "सध्या आपण स्वत: प्रेक्षकांना काय दाखवतोय याचा विचार निर्मात्यांनी केला पाहिजे. सध्या ओटीटीवर ज्या पद्धतीची कंटेट दाखवला जात आहे तो पाहून मला माझ्या मुलांच्या बालपणाची चिंता वाटते," असं या व्यक्तीने म्हटलं आहे.