close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

HAPPY BIRTHDAY- Ajay Devgan बॉलिवूडच्या 'सिंघम'विषयी या खास गोष्टी माहित आहेत का?

'सिंघम' स्टारर अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस.

Updated: Apr 2, 2019, 11:22 AM IST
HAPPY BIRTHDAY- Ajay Devgan बॉलिवूडच्या 'सिंघम'विषयी या खास गोष्टी माहित आहेत का?

मुंबई : 'सिंघम' स्टारर अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस. फक्त आपल्या अभिनयाच्या आणि चिकाटीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले आधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार. अजयने बॉलिवूडमध्ये अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून नाव कामावले आहे. अनेक विनोदी, अॅक्शन अशा सगळ्या धाटणीच्या चित्रपटात त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तर त्याच्या ५०व्या वाढदिवसा दिवशी जाणून घेवूया त्याच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Say Hi to Hollywood's head turner Crystal, debuting soon in Bollywood in #TotalDhamaal. Trailer out soon!

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात, तर अजय उर्फ राजूच्या आयुष्यात त्याची आई वीणा कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. अजय देवगणचे संपूर्ण कुटुंब त्याच्या घरातील कर्ती स्त्री म्हणजे आईवर अवलंबलेलं आहे.

बॉलिवूडमधील सर्वात परिपूर्ण जोडपं म्हंटलं की अजय आणि काजोलचे नाव अव्वल स्थानी असतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

By Popular Demand.

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

अजय आणि त्याच्या मुलांमधील नातं अत्यंत भावूक आहे. तो प्रत्येकवेळी त्याच्या मुलांना प्राधान्य देतो. आपल्या कॅमेरा, अॅक्शन, रोलच्या व्यस्त जीवनातून तो त्याच्या मुलांना नियमीत वेळ देतो. त्याचा मुलगा युग नऊ वर्षांचा आहे. अजय मुलाच्या शाळेच्या प्रत्येक लहान-मोठ्या उत्सवात त्याच्या सोबत असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Smiling again looking at this...

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

अजयसाठी सर्वात जास्त आनंदाचा क्षण म्हणजे कुटुंबांसोबत फिरायला जाणं. आई, वडील, दोन बहीणी त्याचप्रमाणे काजोल आणि त्याच्या दोन मुलांसोबत सुट्ट्यांचा मनमुराद आनंद तो एखाद्या बेटावर साजरा करतो. 

अजयची देवावर नितांत श्रध्दा आहे. तो एक उत्साही शिवभक्त आहे. त्याने त्याच्या छातीवर शंकराचा टॅटू सुध्दा काढला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Dr. Jewel's garage dr.jewelgamadia

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

अजय त्याच्या कामाबद्दल अत्यंत प्रामाणिक आहे. एक दिवसजरी व्यायमाचे सत्र झाले नाही, तरी त्याची चिडचिड होते.

त्याच्या कारच्या कलेक्शनमध्ये त्याला एसयूव्ही अधिक प्रिय आहे. त्याचप्रमाणे त्याच्या कलेक्शनमध्ये ऑडी आणि मर्सिडीज गाड्यांचा सुद्धा समावेश आहे. 

महत्वाचे म्हणजे त्याला वायफळ बडबड केलेली आवडत नाही. अशा वेळेस तो शांत राहणं पसंत करतो.