दोन लग्नानंतरही 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीवर जडला धर्मेंद्र यांचा जीव; हेमा मालिनीसोबतच नातं तुटता तुटता वाचलं

Dharmendra Anita Raj Affair : दोन लग्नं होऊनही धर्मेंद्र 27 वर्षांनी लहान टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री अनिता राजसोबत अफेअर होतं. हेमा मालिनी यांना हे कळताच त्यांनी...

नेहा चौधरी | Updated: Aug 13, 2024, 10:01 AM IST
दोन लग्नानंतरही 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीवर जडला धर्मेंद्र यांचा जीव; हेमा मालिनीसोबतच नातं तुटता तुटता वाचलं title=
Happy Birthday Anita Raj Dharmendra Affair anita raj unknown facts

Dharmendra Anita Raj Affair : बॉलिवूडपासून साऊथपर्यंत तिने आपल्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली होती. 90 च्या दशकातील ही सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनलीय. राज बब्बर, धर्मेंद्र, रजनीकांत आणि कमल हसन यांच्यासोबत काम केलेली ही अभिनेत्री आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जगदीश राज खुराना यांची मुलगी अनिता राज. अभिनेत्रीचा जन्म 13 ऑगस्ट 1962 ला मुंबईत झाला. आज ती 60 वर्षांची झाली आहे. (Happy Birthday Anita Raj)

21 वर्षे रुपेरी पडद्यावरून गायब!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिता राजच्या आयुष्यात एक वेळ आली जेव्हा त्या जवळपास 21 वर्षे रुपेरी पडद्यावरून गायब झाल्यात. अनिता राज यांनी 1981 मध्ये 'लव्ह साँग' या चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतल दिग्दर्शक सुनील हिंगोरानी पहिल्याच चित्रपट 'करिश्मा कुदरत का' (1985) मध्ये काम करत असताना त्यांचं प्रेम जुळलं. यानंतर सुनील आणि अनिता यांचं अफेअर सुरु झालं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anita Raj (@anitaraaj)

त्यांनी 1986 मध्ये लग्न केलं. लग्नानंतरही 'लैला', 'जान की बाजी', 'मेरा हक', 'प्यार किया है प्यार करेंगे', 'क्लर्क', 'नफरत की आँख', 'विद्रोही', 'अधर्म'सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण यानंतर त्या बॉलिवूडमधून गायब झाल्यात. पण 2012 मध्ये चार दिन की चांदनी या चित्रपटातून पुन्हा पदार्पण केलं. पण त्यात यश मिळाल नाही म्हणून त्या टीव्हीकडे वळल्यात. आज त्या टीव्हीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anita Raj (@anitaraaj)

धर्मेंद्र - अनिता यांच्या अफेअरची चर्चा 

दोनदा लग्न करूनही धर्मेंद्र यांचा 27 वर्षांनी लहान असलेल्या अनिता राज यांच्यावर जीव जडला होता. अनिता आणि धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. या दोन्ही कलाकारांनी 'इन्सानियत के दुश्मन', 'नौकर बीवी का', 'जलजला' आणि 'करिश्मा कुदरत का' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. याच दरम्यान त्यांच्यात अफेअर सुरु झालं असं मीडियामध्ये सांगण्यात येतं. 

हेमाने अनिताला दिला होता इशारा

हेमालाही धर्मेंद्र आणि अनिता यांच्या अफेअरची माहिती झाली होती. अशा परिस्थितीत हेमा धर्मेंद्रसोबतचे लग्न मोडण्याची शक्यता होती. अशा स्थितीत अनिताला धर्मेंद्रपासून दूर राहण्याबद्दल हेमा मालिनी यांनी ताकीद दिली होती. त्यानंतर अनिता आणि धर्मेंद्र यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केले नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x