Kajol Net Worth : अजय देवगण की काजोल, कोण सर्वाधिक श्रीमंत? चित्रपटासह बिझनेसमध्येही अभिनेत्रीच सरस

Actress Kajol Business And Net Worth : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिचा आज 50 वा वाढदिवस आहे. अजय देवगण आणि काजोल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय जोडी आहे. हे दोघे करिअरमध्ये उत्तुंग शिखरावर आहे. पण या दोघांपैकी सर्वाधिक कोण श्रीमंत आहे, हे तुम्हाला माहितीये?  

नेहा चौधरी | Updated: Aug 5, 2024, 11:44 AM IST
Kajol Net Worth : अजय देवगण की काजोल, कोण सर्वाधिक श्रीमंत? चित्रपटासह बिझनेसमध्येही अभिनेत्रीच सरस title=
Happy Birthday Kajol Ajay Devgan or Kajol who is the richest Kajol business

Actress Kajol Business And Net Worth: बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काजोल आणि अजय देवगण येतात. बॉलिवूडमध्ये जिथे अनेक जोडप्याच घटस्फोट होत असताना असे काही जोडपे आहेत जे त्यांच्यामधील मजबूत नात्यामुळे आदर्श जोडप मानले गेले आहेत. जवळपास तीन दशकांपासून चित्रपट पडद्यावर लोकांचे मनोरंजन करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. आज काजोल हिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1974 मध्ये मुंबईत अभिनेत्री तनुजा आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांच्या घरी जन्म झाला. काजोलला चित्रपटाची पार्श्वभूमी असली तरी तिला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तिच्या रंगामुळे तिला हिणवलं गेलं पण तिने अभिनयाच्या जोरावर आपला ठसा उमटवला. आज 32 वर्षांपासून ती या इंडस्ट्रीत राज्य करतेय. (Happy Birthday Kajol Ajay Devgan or Kajol who is the richest Kajol business)

दुसरीकडे अभिनेता आणि पती अजय देवगणही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. पण जेव्हा या कुटुंबाच्या संपत्तीबद्दल आणि या दोघांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण आहे, हे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. काजोलने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'बेखुदी' मधून केली. या चित्रपटातील काजोलच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. यानंतर तिने शाहरुख खानसोबत 'बाजीगर'मध्ये झळकली. यामध्ये दोन्ही स्टार्सच्या केमिस्ट्रीने सर्वांची मनं जिंकली. त्यानंतर या जोडीला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट मिळाला.  इथून त्यांची जोडी इतकी हिट झाली की त्यांना एकत्र अनेक चित्रपट मिळालेत. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा काजोलसोबतच शाहरुख खानच्याही करिअरला कलाटणी देणारा ठरला. तेव्हापासून, दोन्ही स्टार्सने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि पडद्यावर त्यांचं अभिनय कौशल्य सिद्ध केलं. आजही त्यांचा हा चित्रपट लोकांना आवडतो. हा सदाबहार चित्रपटांपैकी एक आहे.

काजोलची संपत्ती किती?

काजोल आज चित्रपटांमध्ये क्वचितच दिसते. पण, ती अनेकदा रिॲलिटी शो आणि कार्यक्रमांमध्ये दिसते. ती सध्या चित्रपटांमध्ये कमी सक्रिय असली तरी तिच्या साईड बिझनेसमधून ती भरपूर कमाई करते. चित्रपटांव्यतिरिक्त, जर आपण अभिनेत्रीच्या कमाईच्या साधनांबद्दल बोललो तर ती मॉडेलिंग आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून चांगली कमाई करतंय. यासोबतच काजोल ही व्यवसायही करते. एवढंच नाही तर काजोल समाजसेवेच्या कामातही सक्रिय आहे. काजोल Relief Projects India नावाचा धर्मादाय ट्रस्ट चालवते. यामध्ये ती नवजात आणि अनाथ मुलींसाठी काम करते. तिचा मेकअप ब्रँड Kay मधून ती 1-2 कोटी रुपये कमावते. 

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर काजोल एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 3 कोटी रुपये आणि स्टेज शोसाठी 2-3 कोटी रुपये मानधन घेते. अशा स्थितीत तिचं वार्षिक उत्पन्न 25 कोटींच्या आसपास आहे. तर तिची एकूण संपत्ती ही सुमारे 250 कोटी रुपयांच्या घरात आहे. 

अजय देवगणची संपत्ती काजोलपेक्षा दुप्पट!

अजय देवगणने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. यातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. यानंतर त्यांनी 'जिगर' सारख्या चित्रपटात काम करून चांगले नाव कमावलं. अभिनेत्याच्या कारकिर्दीला 33 वर्षे झाली आहेत. चित्रपटांमध्ये काम करताना तो काजोलच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर दोघांनी 1999 मध्ये लग्न केलं. चित्रपट, नेट वर्थ आणि कमाईच्या बाबतीत अजय देवगण काजोलपेक्षा सरस आहे. 

जर आपण अजयच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो, तर फायनान्शियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 427 कोटींच्या घरात आहे. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच तो स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवतो. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही ते चांगली कमाई करतात. अजय देवगण त्याच्या मुलांच्या नावाने दोन कंपन्या VFX कंपनी, NY VFXWAALA देखील चालवतात. त्याच्याकडे लक्झरी कार, जुहूमध्ये दोन फ्लॅट, लंडनमध्ये घर आणि मुंबईत एक आलिशान घर आहे.