नवी दिल्ली : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सनी देओल आज आपला ६१ वा जन्मदिवस साजरा करत आहे.
सनीचा जन्म १९ ऑक्टोबर १९५६ रोजी झाला होता. सनीला बॉलिवूडमध्ये दमदार अभिनेता म्हणून पाहिले जाते. सनी सोशल मीडियापासून आणि मीडियापासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवत असतो. सनीचे खरे नाव अजय सिंग देओल आहे. घरात त्याला सनी म्हणून हाक मारली जायची, त्यामुळे त्याने हेच नाव चित्रपटात घेतले.
८० च्या दशकाच्या सुरूवातीला बॉलिवूडमध्ये अनेक ताऱ्यांनी आपल्या मुलांना लॉन्च केले. त्यात धर्मेंद्र देखील होते. धर्मेंद्र यांनी आपल्या मोठ्या मुलाला १९८३ मध्ये बेताब या चित्रपटातून लॉन्च केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला, चित्रपटात लॉन्च करण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी सनीला बर्मिंघम येथे अभिनय शिकायला पाठविले होते.
बेताबनंतर सनीचे काही चित्रपट फ्लॉप ठरले. अर्जुन, डकैत, यतीम या सारखे चित्रपट केले. त्यानंतर पाप की दुनिया (१९८८), त्रिदेव (१९८९) सारखे हिट चित्रपट दिले. त्यानंतर १९९०मध्ये त्याचा घायल चित्रपट आला. त्याने त्याच्या करिअरला वेगळे वळण लागले. या चित्रपटासाठी त्याला स्पेशल जुरी पुरस्कार ( राष्ट्रीय पुरस्कार) मिळाला. तसेच फिल्मफेअरचा बेस्ट अभिनेता पुरस्कार मिळाला.
सनी आपला मुलगा करण देओलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा प्रयत्न करीत आहे. बऱ्याच कमी जणांना माहिती की सनीच्या पत्नीचे नाव पूजा देओल आहे. ती एक हाऊस वाईफ आहे. त्यामुळे ती कोणत्याही बॉलीवूडच्या पार्टीमध्ये येत नाही. तसेच ती मीडियापासून दूर असते. त्यामुळे पूजा देओल यांचा अपडेट फोटो कोणाकडे नाही. करण शिवाय सनी देओल यांचा आणखी एक मुलगा आहे. त्याचे नाव राजवीर आहे. पण राजवीरला अजूनही कॅमेऱ्यापासून दूर ठेवले आहे.