Harnaaz Kaur Sandhu चा फॅशन सेंन्स पाहून चाहते आश्चर्यचकित! मिस यूनिवर्सची अवस्था पाहून तुम्हीही व्हाल हैराण

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या हरनाज कौर संधूचा फॅशन सेन्स आजकाल चर्चेत आहे. 

Updated: Jul 12, 2022, 04:23 PM IST
Harnaaz Kaur Sandhu चा फॅशन सेंन्स पाहून चाहते आश्चर्यचकित! मिस यूनिवर्सची अवस्था पाहून तुम्हीही व्हाल हैराण   title=

मुंबई : मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावणाऱ्या हरनाज कौर संधूचा फॅशन सेन्स आजकाल चर्चेत आहे. हरनाजचे हे नवीन फोटो तिच्या चाहत्यांची निराशा करत आहेत. मिस युनिव्हर्सचा किताब पटकावताच हरनाज कौरने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. तेव्हापासून तिची प्रत्येक गोष्ट चर्चेत आहे. हरनाजच्या डाएटपासून तिच्या फॅशन सेन्सपर्यंत प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये चाहत्यांना खूप रस असतो.

फॅशन सेन्समुळे लोक निराश झाले आहेत
अशा परिस्थितीत आता हरनाज कौर संधूने तिच्या लेटेस्ट फॅशन सेन्सने चाहत्यांची निराशा केली आहे. हरनाज कौरने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सोशल मीडिया यूजर्स तिला तिच्या लूकमुळे ट्रोलही करत आहेत.

शेअर केला मोनोक्रोम फोटो
हरनाजच्या या लूकबद्दल सांगायचं झालं तर, या मोनोक्रोम फोटोमध्ये ती लाऊड ​​मेकर अप असलेल्या ब्लॅक वेल्वेट ड्रेसमध्ये खूप बोल्ड दिसत आहे. हरनाजचा हा ड्रेस ऑफ शोल्डर आहे. ज्यामध्ये तिचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. तिच्या ड्रेसमधला हाय स्लिट कट तिचा बोल्डनेस अनेक पटींनी वाढवताना दिसत आहे.

ओव्हर मेकअप
सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे की, हरनाजने या दौऱ्यात जास्तच मेकअप केला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सचं म्हणणे आहे की, हरनाजच्या फॅशन सेन्सने तिने पूर्णपणे आश्चर्यचकित केलं आहे. यासोबतच काही लोकं तिच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत तिच्या स्टाइलला बकवास म्हणत आहेत.

जर तुम्ही हरनाज कौरच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी तुम्हाला भरलेलं दिसेल.  ती तिचं वैयक्तिक आणि प्रोफेशनल अपडेट्स फोटो आणि व्हिडिओंद्वारे शेअर करत असते. याआधीही हरनाज वाढत्या वजनामुळे ट्रोल झाली होती. मात्र, त्यानंतर हरनाजने आपल्या आजाराबाबत सर्वांना सांगितलं होतं.