Fact Check : बिपाशा बासूने दिला बाळाला जन्म; फोटो सोशल मीडियावर समोर

बिपाशाचे नवजात बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत

Updated: Oct 19, 2022, 04:33 PM IST
Fact Check : बिपाशा बासूने दिला बाळाला जन्म; फोटो सोशल मीडियावर समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचं डोहाळे जेवण मोठ्या थाटा-माटात पार पडलं.  ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. प्रेग्नेंसी एन्जॉय करत असताना अचानक बिपाशाचे नवजात बाळासोबतचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री पती करण सिंग ग्रोव्हरसोबत नवजात बाळासोबत पोज देताना दिसत आहेत.

फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स या जोडप्याचं अभिनंदन करत आहेत. कदाचित बिपाशाने मुलाला जन्म दिला असावा, असं चाहत्यांना वाटतंय. या कपलच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

या छोट्या चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव करताना हे जोडपं नवीन पालकांसारखे दिसत आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटो मागचं सत्य सांगणार आहोत. फोटोत दिसणारी  ही मुलगी बिपाशाची नाही. अभिनेत्रीने अद्याप मुलाला जन्म दिलेला नाही. बिपाशाच्या मांडीवर असलेली ही मुलगी अभिनेता विवान भटेनाची आहे. बिपाशा आणि करण टीव्ही अभिनेता विवानच्या मुलीला अचानक भेट म्हणून त्याच्या घरी भेटायला गेले होते.

हे फोटो 2019 मधील आहे जे 2019 मध्ये करण सिंग ग्रोव्हरने पोस्ट केले होते. मात्र, आता बिपाशाच्या प्रेग्नेंसीनंतर हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून, कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी या जोडप्याला आई-वडील झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

टीव्ही अभिनेता विवान भटेना आणि करण सिंग ग्रोव्हर हे  चांगले मित्र आहेत. लग्नाच्या 14 वर्षानंतर विवान आणि त्याची पत्नी आई-वडील झाले. त्यामुळे बिपाशा आणि करणने घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. बिपाशा आणि करण दोघंही विवानच्या मुलीला भेटण्यासाठी खूप आनंदी आणि उत्साहित दिसत होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करणने 2019 मध्ये सोशल मीडियावर मुलीसोबतचे हे अतिशय गोंडस फोटो शेअर केले होते. फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन दिलं की, "आज या सुंदर छोट्या देवदूताला भेटून खूप आनंद झाला. नाव आहे निवाया.  

बिपाशाच्या गरोदरपणात, चाहत्यांनी या जोडप्याच्या जुन्या फोटोवर कमेंट करायला सुरुवात केली. यूजर्सनी स्टार कपलचे अभिनंदन करायला सुरुवात केली. बहुतेक युजर्स कमेंट बॉक्समध्ये बिपाशाचे आई झाल्याबद्दल अभिनंदन करताना दिसत आहेत. तर काहीजण तिच्या मुलीला सुपर क्यूट म्हणत तिचे कौतुक करत आहेत. त्यामुळे हा फोटो चर्चेत आला आहे.