'रेप सीन्सवर अभिनेते मकरंद देशपांडे यांचं आश्चर्यकारक उत्तर; चाहते हैराण

मकरंद देशपांडे हे एक असे अभिनेता आहेत ज्यांनी आपल्या अभिनय आणि कलेच्या जोरावर इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे. 

Updated: Jun 1, 2022, 07:37 PM IST
'रेप सीन्सवर अभिनेते मकरंद देशपांडे यांचं आश्चर्यकारक उत्तर; चाहते हैराण title=

मुंबई : मकरंद देशपांडे हे एक असे अभिनेता आहेत ज्यांनी आपल्या अभिनय आणि कलेच्या जोरावर इंडस्ट्रीत ठसा उमटवला आहे.  चित्रपटांपेक्षा ते थिएटर आर्टिस्ट म्हणून ते ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी 'रेप: प्लीज स्टॉप इट' या नाटकाचा प्रीमियर केला. बलात्काराबाबत चिंता व्यक्त करत मकरंद देशपांडे यांनी त्यांचा जुना अनुभवही सांगितला.

मकरंद यांनी ९० च्या दशकातील गोष्ट सांगितली
आपल्या एका चित्रपटातील सीनचा संदर्भ देत अभिनेत्याने सांगितलं की, ९० च्या दशकात त्यांनी शेवटच्या चित्रपटात रेपसीन शूट केले होते. त्या सीननंतर त्यांना त्या सीनचा अनुभव विचारण्यात आला. मकरंद यांनी सांगितलं की, शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या काही लोकांनी या रेप सीनच्या शूटिंगमध्ये मजा आली की नाही असा प्रश्न केला याच बरोबर. त्यांना विचारलं सीन शूट करताना कसं वाटलं?

अनुभव शेअर करताना मकरंद यांनी सांगितलं की, मला यात काही किळसवाणं वाटलं नाही, तुम्ही त्या नायिकेला विचारलं का की तिला कसं वाटलं?  'मला वाटतं की अशा लोकांना अशा जघन्य गुन्ह्यांचा आनंद मिळतो'.

मकरंद यांचा शेवटचा चित्रपट 1994 साली आला होता आणि त्याचं दिग्दर्शन संजय खन्ना यांनी केलं होतं. या चित्रपटात मकरंद मुख्य खलनायकाच्या भूमिकेत होते. जो कॉलेजच्या प्रिन्सिपलच्या मुलीवर रेप करतो आणि त्याचा आरोप मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यावर लावला जातो. या चित्रपटात सुनील शेट्टी, सोमी अली, आलोक नाथ आणि परेश रावल हे कलाकारा महत्त्वाच्या भूमिका होत्या.